Shocking video: कोणताही सण असो यानिमित्त बाजारात विविध पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. खरं सांगायचं झालं मिठाईशिवाय कोणताही सण किंवा आनंदाचा क्षण अपूर्णच आहे. मात्र आजकाल आपण बातम्या ऐकतो की, खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. आता तर देशी तूप आणि शुद्ध मावा मिठाईतही भेसळ आढळून येत आहे, जी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर सणासुदीच्या काळात तुम्हीही बाहेरुन मिठाई घेत असाल तर आधी हा समोर आलेला व्हिडीओ पाहा. तुम्हीही बाजारातून रसगुल्ले आणून खूप आवडीने खात असाल तर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपल्या आरोग्याची चिंता सतावू लागेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही रसगुल्ले खाताना शंभर वेळा विचार कराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पॅक डब्यामध्ये मिळणारी मठाई म्हणत आपण डोळे बंद करुन ही मिठाई घरी आणतो मात्र समोर दिसणारं चित्र किळसवाणं आहे. हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन ते तीन तरुण रसगुल्ला ही मिठाई एका डब्ब्यामध्ये भरत आहेत. यावेळी त्यांनी हातात कोणत्याही प्रकारचे हातमोजे घातलेले नाहीयेत. तसेच कोणत्याही स्वच्छतेची काळजी याठिकाणी घेतलेली दिसत नाहीये.
खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ kharartochd या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावेळी तरुणीने कॅप्शनमध्ये, “अजून खा रस्सगुल्ले.” तर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.