बंद पडलेले रेल्वे स्टेशन सुरु व्हावे यासाठी नागरीकांना काय काय करावे लागेल सांगता येत नाही. भारतातील राजस्थानमधील रशिदपुरा खोरी हे एक रेल्वे स्टेशन सध्या विशेष गाजत आहे. आता याचे कारण काय तर हे स्टेशन प्रशासन नाही तर या गावातील नागरीकच चालवतात. ज्याठिकाणी गर्दी कमी असते त्याठिकाणी रेल्वे स्टेशनचे कामकाज करणे रेल्वे प्रशासनाला परवडणारे नसते. त्यामुळे रेल्वे स्टेशन बंद केले जाते. पण यामुळे नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी येतात. रशिदपुरा खोरी याठिकाणी पुरेसे उत्पन्न होत नसल्याने हे रेल्वे स्टेशन अचानक बंद करण्यात आले. पण नागरिकांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन या गावानेच पुढाकार घेतला आणि रेल्वे स्टेशन स्वत:च चालविण्याचे ठरविले. आता याठिकाणी तिकिट देण्याचे आणि इतर प्रशासकीय कामे हे स्थानिक नागरिकच करतात.

अशाप्रकारे नागरिकांव्दारे चालवले जाणारे हे एकमेव रेल्वे प्रशासन आहे असे वायव्य रेल्वेचे अधिकारी तरुण जैन यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना सांगितले. २००९ पासून २०१५ तिकिटे काढण्यापासून ते रेल्वेची सफाई करण्यापर्यंत सर्व कामे ही मंडळी करतात. याशिवाय याठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही रेल्वे प्रशासनाकडून सांभाळली जाते. आता हे करण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, रेल्वे प्रशासनाने रशिदपुरा खोरी हे रेल्वेस्टेशन बंद केले होते. मात्र त्यामुळे राजस्थानमधील अनेक नागरिकांचा प्रवासाचा प्रश्न उभा राहिला होता. जवळपास ४ वर्षे हे रेल्वे स्टेशन सुरु करण्यात यावे यासाठी नागरिकांनी बरेच प्रयत्न केले होते. पण त्यावेळीही प्रशासनाने एक अट घातली. ३ लाख रुपयांची तिकिटे खरेदी झाली तरच पुन्हा स्टेशन सुरु करणार असे सांगितले.

आता याठिकाणी नागरिकांना रेल्वेची आवश्यकता असल्याने आणि गावातील प्रशासनाने आग्रह केल्याने रेल्वे सुरु करण्यात आली आहे. मात्र ३ लाखांपर्यंत तिकिटे विकली जात नसल्याने गावातील लोकांना ४० हजार रुपये रेल्वेला भरावे लागत आहेत. सुरुवातीला हे रेल्वे स्टेशन सुरु व्हावे म्हणून गावातील लोकांनी आवश्यकता नसताना एकावेळी १० तिकिटे खरेदी केली असे येथील स्थानिकांनी सांगितले. यामध्ये तिकिटे देण्याबरोबरच नागरिकांची तिकिटे तपासण्याची जबाबदारी येथील नागरिकच सांभाळतात.

Story img Loader