सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपण हैराण होतो तर कधी कधी आपल्याला खूप हसूही येते. इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका मांजर आणि उंदराचा आहे. व्हिडीओमध्ये उंदीर आणि मांजर यांच्यात पकडापकडी सुरु आहे.
उंदीर आणि मांजरीचे कार्टून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतात. उंदीर आणि मांजरावर अनेक कार्टून बनवले गेले असले तरी ‘टॉम अँड जेरी’ हे कार्टून सर्वाधिक पाहिले आणि आवडले गेले आहे. लहान मुलांबरोबरच प्रौढही टॉम अँड जेरी कार्टून मोठ्या आवडीने पाहतात. या कार्टूनमध्ये टॉम नेहमी जेरीच्या मागे पडलेला दिसतो. मात्र, प्रत्येक वेळी जेरी आपल्या हुशारीने पळून जातो.
किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video
जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की मांजर भक्षाच्या शोधात इकडे तिकडे भटकत असते. यादरम्यान त्याची नजर भिंतीवर चढणाऱ्या उंदरावर पडते. यानंतर मांजर एकाच उडीत उंदरापर्यंत पोहोचते. मांजर उंदराला पकडते. त्याचवेळी उंदरालाही कळते की आता आपलं काही खरं नाही.
तथापि, उंदीर तिथून पळून जाण्याचा शेवटचा प्रयत्न करतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उंदीर चतुराईने हात जोडून मांजरासमोर उभा आहे. उंदीर मांजराकडे आयुष्याची भीक मागताना दिसतो. उंदराला हे करताना पाहून मांजराचे लक्ष विचलित होते. यानंतर उंदीर तेथून वेगाने पळून जातो. अशा प्रकारे तो मांजराला मूर्ख बनवतो. Unseen Zindagi नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मला माफ करा मावशी.’