Viral Video Rat Found in Mithai Shop: सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही चमचमीत खाद्यपदार्थांचे व्हिडीओ पाहिले असतील. ते व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण अनेकदा सोशल मीडियावर स्क्रोल करता करता अशाच खाद्यपदार्थांचे आपल्याला असे काही व्हिडीओ दिसतात की, जे पाहून किळस येते. अशा व्हिडीओंमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कधी उंदीर, कधी झुरळ तर कधी पाल आढळल्याचे दिसते.

सध्या असाच एक किळसवाणा प्रकार दिल्ली येथील एका मिठाईच्या दुकानात घडला आहे; जिथे मिठाईवर चक्क दोन उंदीर फिरताना दिसले.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

हेही वाचा… काकांनी बेकार हाणला! ट्रेनमध्ये बसलेल्या काकांबरोबर तरुणाने केलं असं काही की, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एका मिठाईच्या दुकानात काचेच्या डिस्प्ले केसमध्ये ठेवलेल्या मिठाईवर चक्क दोन उंदीर फिरताना आणि ट्रेमधील मिठाई चाखताना दिसत आहेत. असं सगळं असूनही दुकानात मोठ्या संख्येनं ग्राहक मिठाई खरेदी करताना दिसत आहेत.

या व्हिडीओत उंदीर असलेल्या मिठाईच्या ट्रेजवळ मिठाई शॉपमधील एक माणूस (स्टाफ) येतो. उंदरांना पाहूनही तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही. हीच सत्य परिस्थिती आहे, असं समजून तिथले सगळे स्टाफ मेंबर अगदी बेफिकिरीने या व्हिडीओत वावरताना दिसतायत. याचा जाब व्हिडीओ काढणारी व्यक्ती विचारते. व्हिडीओग्राफर त्या स्टाफला बोलावतो, “तुम्ही दुकानात अशा वस्तू ठेवता का,” असा सवाल तो बाजूला असलेल्या स्टाफला म्हणतो.

हे मिठाईचं दुकान दिल्लीच्या भजनपुरा भागात आहे. अग्रवाल स्वीट्स, असं त्याचं नाव आहे. हे मिठाईचं दुकान खजुरी चौकात असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ @GagandeepNews या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “काउंटरवर ठेवलेल्या मिठाईमध्ये उंदीर फिरत आहेत. हा लोकांच्या आरोग्याशी मोठा खेळ आहे. असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई कधी करणार? राजधानी दिल्लीतील खजुरी चौक अग्रवाल स्वीट्स या दुकानातून हे प्रकरण समोर येत आहे,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… आता फक्त भावाचीच हवा; भर वर्गात केलं असं काही की पोरी झाल्या फिदा; VIDEO एकदा पाहाच

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था नाही,” तर, दुसऱ्यानं “हा पाळीव उंदीर असावा”, अशी कमेंट केली.

Story img Loader