Ratan Tata Lifestyle : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा यांनी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८६व्या वर्षी रतन टाटा यांची मुंबईतील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आता देशातूनच नाही तर जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. तसंच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला रतन टाटांच्या आयुष्याशी संबंधित १० दुर्मिळ आणि ऐतिहासिक फोटोंविषयी सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेआरडी आणि रतन टाटा

रतन टाटा यांनी जेआरडी टाटांबरोबरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात केला होता. हा फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी लिहिले होते की, हा फोटो टाटा इस्टेटच्या पुण्यातील प्लांटच्या लॉन्चिंग सोहळ्यावेळी काढण्यात आला आहे.

रतन टाटा यांचा दुसरा फोटो त्यावेळच आहे, जेव्हा ते पहिल्यांदा टाटा स्टील प्लांटमध्ये गेले होते. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते की, जमशेदपूर या हेरिटेज सिटीशी झालेली माझी ही पहिलीच भेट होती.

रतन टाटा यांचा हा तिसरा फोटो लॉस एंजेलिसहून भारतात परतले त्यावेळचा आहे.

रतन टाटा यांचा हा चौथा फोटो अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात शिकत असताना काढलेला आहे.

प्रत्येक भारतीय हा फोटो कधीच विसरणार नाही, कारण टाटा समूहाने पहिली स्वदेशी कार बाजारात आणली त्यावेळचा हा फोटो आहे. हा फोटो भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.

देशातील पहिली स्वदेशी कार टाटा इंडिकाबरोबर रतन टाटा यांचा ऐतिहासिक फोटो

रतन टाटा यांचा भाऊ जिमी टाटांबरोबर लहानपणी काढलेला हा फोटो आहे.

रतन टाटा यांनी भारतीयांना सर्वात स्वस्त कार आणणार असा विश्वास दिला होता! तिचं सर्वात स्वस्त नॅनो कार लॉन्च करताना रतन टाटा यांचा हा फोटो आहे.

एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे परत आल्यावर रतन टाटा यांनी ही पोस्ट शेअर केली होती.

Read More Ratan Tata Latest News : रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो

रतन टाटा यांना मुक्या प्राण्यांविषयी अधिक आपुलकी होती, त्यांनी सोशल मीडियावर प्राण्यांसाठी विशेषतः श्वानांच्या संरक्षणासंदर्भात अनेकदा आवाहन केले होते.

Read Ratan Tata passed away Updates : Tata Companies List : मिठापासून विमानापर्यंत, ‘या’ कंपन्या आहेत टाटा समूहाच्या मालकीच्या

त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याबरोबरचा फोटोही शेअर केला होता, ज्याचे नाव टिटो असे होते. त्याच्या मृत्यूनंतरही रतन टाटा अनेक वर्षे त्याची आठवण काढत राहिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan naval tata passes away final rites of legend industrialist ratan tata performed with full state honours see this 10 historical photos of business tycoon tata group sjr