Ratan Tata Death: मैत्रीला वयाचं बंधन नसतं, त्यामुळे वयात कितीही अंतर असलं तरी सूर जुळल्यावर तुमची छान मैत्री होऊ शकते. याचच उदाहरण म्हणजे, रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री. रतन टाटा आणि शांतनू नायडू या दोघांची मैत्री खूपच खास होती. वयात ५५ वर्षांचं अंतर असताना रतन टाटा आणि शांतनूमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर टाटा समूहातील कामगार आणि रतन टाटा यांचा तरुण जिवलग मित्र शांतनू नायडू याने त्याचा जवळचा मित्र गमावला. दरम्यान, रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतनू बाईकद्वारे हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करत होता. शांतनूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून सर्वच भावूक झाल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळी कुलाबामधील त्यांच्या निवासस्थानी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रतन टाटा यांचं पार्थिव एका गाडीमधून मुंबईतील एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. यादरम्यान रतन टाटा यांचा ३१ वर्षीय जिवलग मित्र आणि स्वीय सहाय्यक शांतनू नायडू देखील होता. यावेळी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतून बाईकद्वारे हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करताना दिसला.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
emotional quote viral video rickshaw driver write heart touching best line for father
VIDEO : रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की, पाहून अनेकांना झाली वडिलांच्या कष्टाची जाणीव; लोक म्हणाले, “लाखात एक…”
Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”

दरम्यान, शांतनू नायडू यानं रतन टाटांच्या निधनानंतर एक खास पोस्ट लिहिली आहे. “रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे. अलविदा माझ्या लाईटहाऊसला…,” अशी पोस्ट शांतनूने लिहिली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: टाटांचा श्वास थांबला अन् गरब्यातील सळसळती पावलंही; निधनाची बातमी ऐकताच मुंबईकरांनी अक्षरश: हात जोडले

Who is shantanu naidu: शांतनू नायडू कोण आहे?

शांतनू नायडू हा रतन टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा मित्र व सहाय्यक म्हणून तो ओळखला जातो. रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यातील मैत्रीचा समान धागा म्हणजे दोघांचेही समाजावर असलेले प्रेम. दोघांची पहिली ओळख २०१४ साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. रतन टाटांच्या शेवटच्या काही दिवसांत शांतनूच त्यांच्यासोबत होता. शांतनू नायडू हा टाटा ऑफिसमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतो. तसंच, नव्या स्टार्टअप्ससाठी टाटा ग्रुपला गुंतवणुकीसाठी सल्ले देतो. इतकंच नव्हे तर शांतनूची स्वतःची एक संस्था आहे.

Story img Loader