Ratan Tata Reflects on Loneliness : भारतीय उद्योग विश्वामध्ये आपलं अधिराज्य गाजवणारे टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सगळीकडे शोककळा पसरली आहे. त्यांचे मित्र, आप्तस्वकीय व असंख्य चाहते सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. सोशल मीडियावर त्यांचे जुन्या मुलाखतीचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सिमी गरेवाल ‘Rendezvous with Simi Garewal’ यांच्या टॉक शोमधील आहे. या कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा यांनी सिमी गरेवाल यांच्या प्रश्नाला उत्तर देत पत्नी,मुले कुटुंबाशिवाय त्यांचे आयुष्य कसे होते, याविषयी भाष्य केले होते.

पत्नी, मुले व कुटुंबाविषयी काय म्हणाले होते रतन टाटा?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सिमी गरेवाल या रतन टाटा यांना प्रश्न विचारतात, ” बायको, मुले, कुटुंबाशिवाय तुम्हाला कुठून प्रेरणा मिळते?” त्यावर रतन टाटा उत्तर देतात, “मला माहीत नाही की मला कुठून प्रेरणा मिळते पण मी एक मिनिट जर तसा विचार केला तर अनेकवेळा मला पत्नी किंवा कुटुंब नसल्यामुळे एकटेपणा जाणवतो. काही वेळा त्याबाबत इच्छा होते पण कधी कधी दुसऱ्याच्या भावनांची काळजी न करण्याचे स्वातंत्र्य जे मला मिळते, त्याचा मी आनंद घेतो.”

हेही वाचा : Ratan Tata First Job : रतन टाटांना स्वत:च्याच कंपनीत नोकरीसाठी द्यावा लागला होता बायोडाटा; नेमकं घडलं काय होतं? जाणून घ्या रंजक किस्सा

पाहा व्हायरल व्हिडीओ

Aparna Mishra (Mishu) या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रतन टाटा हे एक महान व्यक्ती होते जे आजच्या जगात दिसत नाही, आज देशाने आपला अनमोल रतन गमावला आहे.
असे महान व्यक्ती कधीच मरत नाही
ते सदैव आपल्या हृदयात जिवंत राहीन.
आज त्यांना कुटुंब नाही पण संपूर्ण देश त्याच्यासाठी रडतोय…
ओम शांती”

हेही वाचा : VIDEO: टाटांचा श्वास थांबला अन् गरब्यातील सळसळती पावलंही; निधनाची बातमी ऐकताच मुंबईकरांनी अक्षरश: हात जोडले

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एका युगाचा अंत झाला” तर एका युजरने लिहिलेय, “व्यवसाय, नेतृत्व आणि मानवतेमध्ये रतन टाटाजींनी सोडलेली छाप सदैव स्मरणात राहीन. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. श्रद्धांजली” आणखी एका युजरने लिहिलेय, “महान व्यक्ती कधीच मरत नाही”