Ratan tata video: टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (९ ऑक्टोबर) निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतातच नव्हे, तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यांत पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांसाठी रतन टाटा हे देवासारखे होते, अनेकांनी रतन टाटा यांना त्यांच्या कार्यामुळे देवाचाच दर्जा दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींसाठी तर रतन टाटा हे आदर्श होते. केवळ एक उद्योगपती म्हणूनच नव्हे, तर त्यांची साधी राहणी, परोपकारी व दानशूर वृत्ती यांमुळे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श व प्रेरणास्थान झाले होते. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, उद्योग, कला व सामान्य वर्ग अशा सर्वच स्तरांतून शोकाकुल प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, रतन टाटांना देवासमान मानणाऱ्या एका तरुणानं रतन टाटा यांचा फोटो आपल्या घरातल्या देव्हाऱ्यात ठेवलाय. त्याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

रतन टाटांना देव्हाऱ्यात स्थान

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण त्याच्या घरातील देव्हाऱ्यामध्ये रतन टाटा यांचा फोटो ठेवताना दिसत आहे. आपली देवावर श्रद्धा असते आणि त्यामुळेच त्याची आपण रोज पूजा करतो. तसेच रतन टाटासुद्धा माझ्यासाठी देवच आहेत, अशी भावना या तरुणानं व्यक्त केली आहे. तरुणानं देव्हाऱ्यात इतर देवांच्या मूर्तींशेजारीच रतन टाटा यांचा फोटो ठेवला आणि त्यांना फुलं वाहिली आहेत. त्यानंतर रतन टाटा यांच्या फोटोच्या तो पाया पडला. मागे एका कार्यक्रमादरम्यान “कोणाचेही नुकसान न करणारी, तसेच व्यवसायाला सर्वोच्च प्राधान्य देणारी व्यक्ती म्हणून लोकांनी मला लक्षात ठेवावे,” अशी इच्छा रतन टाटा यांनी बोलून दाखवली होती

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे” रतन टाटांनी एका मेसेजमध्ये थांबवली होती महिलेची ट्रोलिंग, पाहा पोस्ट

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shreyaan.daga नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरी या तरुणाचं कौतुक करीत असून, रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata death young man ratan tatas photo kept in his home temple emotional video goes viral on social media srk