Ratan Tata First Job Story: भारतात रतन टाटा यांचे नाव एक यशस्वी उद्योपगती म्हणून घेतले जाते. टाटा समूहाला एका नव्या उंचवीर नेत भारताचे नाव त्यांनी जगभरात पोहोचले. आज भारतात क्वचित असं कोणतं क्षेत्र असेल जिथे टाटा समुह पोहोचलेला नसेल. अगदी तुमच्या घरातील मिठापासून ते विमानापर्यंत अनेक क्षेत्रात टाटा समुहाने आपली विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. पण इतकं सगळं असूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्यामुळे रतन टाटा हे यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आज इतकं मोठं व्यावसायिक साम्राज्य निर्माण करणारे रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक कर्मचारी म्हणून केल्याचे आज फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी पहिला नोकरी टाटा ग्रुपमध्ये नाही तर एका दुसऱ्या कंपनीत केली. त्या कंपनीत काम करत असताना त्यांनी टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आपला बायोडाटा बनवला होता. पण असे का?त्यावेळी नेमकं असं काय घडलं होतं? जाणून घेऊ रंजन किस्सा
रतन टाटांनी स्वत:च्याच कंपनीत नोकरीसाठी केला होता अर्ज
ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा रतन टाटा अमेरिकेत अभ्यासासाठी गेले होते. तिथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, त्यानंतर त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण दरम्यानच्या काळात त्यांची आजी लेडी नवजबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहात पहिली नोकरी स्वीकारली नाही, पण ते IBM कंपनीत रुजू झाले, पण ते IBM मध्ये नोकरी करतात याची खबर त्यांच्या कुटुंबातील कोणीही नव्हती.
टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन जेआरडी टाटा (JRD Tata) यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते खूप संतापले, त्यांनी रतन टाटा यांना फोन करून खडसावले की, ‘तुम्ही भारतात राहून आयबीएमसाठी काम करू शकत नाही.’ याचवेळी त्यांनी रतन टाटा यांना लगेच त्यांचा बायोडेटा शेअर करण्यास सांगितले.
Tata Companies List : मिठापासून विमानापर्यंत, ‘या’ कंपन्या आहेत टाटा समूहाच्या मालकीच्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे त्यांचा बायोडाटा नव्हता, म्हणून त्यांनी आयबीएम ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटरवर टाईप करून त्यांचा बायोडाटा तयार केला आणि तो बायोडेटा जेआरडी टाटा यांना शेअर केला, यानंतर त्यांना १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली. टाटा कुटुंबातील सदस्य असूनही नोकरी स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांना त्यांच्या कंपनीतील सर्व कामे करावी लागली. सर्व कामांचा अनुभव घेत ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचले.
१९९१ मध्ये टाटा सन्स आणि टाटा समूहाचे बनले अध्यक्ष
यानंतर १९९१ मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्स आणि टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी २१ वर्षे टाटा समूहाचे नेतृत्व केले आणि त्याला मोठ्या उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टेटली टी, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले. त्यांच्या देखरेखीखाली टाटा समूहाचा १०० हून अधिक देशांमध्ये विस्तार झाला. टाटा नॅनो कार ही देखील रतन टाटांची आयडिया होती.