भारतातासह जगातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) सर्वसामान्यांना परिचीत आहेत . रतन टाटांना खूप मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग फॉलो करतो. अनेकजण त्यांना आपला आदर्श मानतात. यशस्वी उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व, यासह नम्र स्वभाव आणि साधी राहणी यामुळे रतन टाटांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
शिवाय कोरोना काळापासून तर रतन टाटा यांच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये असणारा आदर आणखी वाढला आहे. कारण, टाटा यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक मदत केली होती, त्यामुळे रतन टाटा माहित नाहीत अशी एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. उद्योग विश्वात आपली अनोखी छाप पाडणारे रतन टाटा सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय असतात. या वयातही ते लोकांना आपल्याबद्दलची प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात.
हेही पाहा- चालकाने बस थांबवत रस्त्यावरील चिमुकल्यांना वाटला खाऊ; मुलांच्या चेहऱ्यावरील ‘तो’ आनंद होतोय Viral
कधी परदेशी यात्रा केलेले फोटो तर कधी एखाद्या लाडक्या प्राण्यासोबत वेळ घालवलेले फोटो, यांसारख्या अनेक गोष्टी ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. शिवाय लोकांनाही त्यांच्याबद्दल सतत नवनवीन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. सध्या अशीच एक आपल्या लहानपणाची आठवण सांगणारी पोस्ट रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर केली आहे.
ज्यामध्ये त्यांनी आपला लहाण भाऊ जिमी टाटा आणि त्यासोबत त्यांच्या पाळीव कुत्र्याचा १९४५ सालचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “ते आनंदाचे दिवस होते, ज्यावेळी आमच्यामध्ये काहीही येत नव्हेत.” (माझा भाऊ जिमी सोबत १९४५). त्यांनी हा फोटो शेअर करताच त्यांच्या लाखो चाहत्यांनी तो लाईक केला आहे. तर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘सर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे आणि मी तुमचा खूप आदर करतो.’ तर आणखी एका चाहत्याने, ‘सर तुम्ही खूप देखणे आणि स्मार्ट दिसत आहात.’ म्हटलं आहे. तर काही लोकांनी जर तुम्ही खरे हिरो आहात असंही कमेंटमध्ये लिहिलं आहे.