RATAN TATA: देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्यांचे नाव आदराने घेतात. कोट्यावधीचा व्यवसायाचे मालक असलेले रतन टाटा त्यांच्या माणुसकीसाठी देखील ओळखले जात होते.
रतन टाटा संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहचले
रतन टाटा यांचे पूर्ण नाव रतन नवल टाटा आहे. ते ८६ वर्षांचे होते. २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्म झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नातू आहेत. रतन टाटा यांनी त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने असे काम केले आहे जे प्रत्येकाला करणे शक्य नव्हते. आपल्या संघर्षामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.
हेही वाचा – १६५ कोटीं खर्च करून पाळीव प्राण्यांसाठी पहिले हॉस्पिटल! प्राणी प्रेमी रतन टाटा यांचा शेवटचा प्रकल्प…
रतन टाटा यांचे १० आदर्श विचार
रतन टाटा यांचे आदर्श, विचार आणि सिद्धांत तरुणी पिढीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार जाणून घेऊ या जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रेरणा देतील.
रतन टाटा यांचे १० प्रेरणादायी विचार
- “आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ECGमध्ये सरळ रेषेचा अर्थ असतो आपण जीवंन नाही”
- “सत्ता आणि पैसा हे माझे सिद्धांत नाही”
- “जर तुम्हाला वेगात चालायचे असेल तर एकटे चालत राहा पण तुम्हाला दुरपर्यंत चालायचे असेल तर इतरांच्या बरोबर चाला.”
- लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याला त्याच गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही त्याला त्याची मानसिकता नष्ट करते.
- लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर ते उचला आणि त्याचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
- मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही मी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य करून दाखवतो.
- ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुखी दिवस असेल.
- शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
- सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे
- गोष्टी नशिबावर सोडण्यावर माझा विश्वास नाही. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर विश्वास आहे.