Shantanu Naidu On Ratan Tata:  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. राजकीय नेते, उद्योगपती ते खेळाडूंपर्यंत अनेक जण त्यांना आदरांजली वाहत आहेत. दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही युजर्स हळहळ व्यक्त करत आहेत. यात रतन टाटा यांच्याबरोबर नेहमी सावलीसारखे उभे राहणारे आणि त्यांचा सर्वात जवळचा मित्र शंतनू नायडू यांनीही एक भावनिक पोस्ट केली आहे.

रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक, शंतनू नायडू यांनी गुरुवारी सकाळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये रतन टाटा यांना ‘नॅशनल आयकॉन’ असे म्हणत पुढे आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

रतन टाटा यांच्या निधनानंतर शंतनू नायडू यांची भावनिक पोस्ट

रतन टाटा यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शंतनू यांनी रतन टाटा यांच्या व्यावसायिक कामगिरीवर नव्हे तर त्यांच्यातील घनिष्ठ मैत्रीवर प्रकाश टाकला आहे.

हेही वाचा – मिठापासून विमानापर्यंत, ‘या’ कंपन्या आहेत टाटा समूहाच्या मालकीच्या

“या मैत्रीनंतर आता त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमाची किंमत आहे, अलविदा, माझ्या प्रिय दीपस्तंभा (लाईटहाऊस).” अशा शब्दात शंतनू नायडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रतन टाटांच्या निधनानंतर शंतनू नायडू यांची भावनिक पोस्ट

रतन टाटा आणि शंतनू यांची मैत्री

शंतनू नायडू यांची रतन टाटांबरोबरची घनिष्ठ मैत्री त्यांचे प्राण्यांवर असलेल्या प्रेमातून फुलली. २०१४ मध्ये दोघांची भेट झाली होती. शंतनू नायडू यांनी रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांचे कारच्या धडकेपासून संरक्षण करण्यासाठी रिफ्लेक्टिव कॉलर विकसित केली. शंतनू यांनी भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराने प्रभावित होत रतन टाटा यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांंना आमंत्रित केले.

हेही वाचा – रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो

गेल्या १० वर्षांत शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू मित्र बनले; गेल्या काही वर्षांमध्ये रतन टाटा यांच्याबरोबर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शंतनू नायडू दिसायचे.