Ratan Tatas Dog Emotional Video : आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची प्रचिती उद्योगपती रतन टाटा यांच्या प्रत्येक कृतीतून येत होती. पण, आज ते आपल्यात नाहीत याचं दु:ख सर्वच जण व्यक्त करीत आहेत. जगात फार कमी लोक असे असतात की, जे स्वत:सह इतरांचा आणि विशेषत: प्राण्यांचा विचार करीत जगतात. रतन टाटा अशाच नि:स्वार्थी लोकांपैकी एक होते. आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याप्रति त्यांना प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याची बातमी समजताच टाटा समूहाशी संबंधित अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसले. रतन टाटा यांचे पशूप्रेम सर्वांनाच ठाऊक असेल. त्यांनी आजवर लाखो श्वानांना मदत करीत जीवनदान दिले. त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनावेळीही त्यांचे लाडके श्वान तिथे उपस्थित होते. रतन टाटा यांच्या श्वानप्रेमाची प्रचिती देणारा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका रतन टाटांचा फोटो पाहिल्यानंतर श्वानाने केलेली कृती पाहून अनेक जण भारावून जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा