Ratan Tata: उद्योग क्षेत्रातील सर्वांच मोठे नाव म्हणजे रतन टाटा. हे देशातील सर्वात प्रभावशाली नावांपैकी एक आहे. रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा हे त्यांच्या मृदू आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जातात. रतन टाटा यांचे जीवन तत्वज्ञान साधेपणा आणि नम्रतेवर आधारित होतं. लहान असे किंवा मोठा त्यांच्यासाठी प्रत्येकजण हा सारखाच असायचा. उद्योगपती, उद्योजक आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष अशा किती तरी अनेक पदव्या त्यांच्या नावावर आहेत. पण त्यापेक्षाही त्यांचा साधेपणा, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि अनेक चांगल्या कामांसाठी त्यांना ओळखले जाते. दरम्यान इन्स्टाग्रामवरची एक जुनी पोस्ट आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी आपला जमीनीवर बसलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. रतन टाटांचे लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते होते त्यामुळे रतना टाटांना सोशल मीडियावरही नेहमीच एक आदर मिळालाय. वाईट कमेंट आणि ट्रोलिंगच्या जमान्यात रतन टाटांच्या पोस्टवर कुणी चुकीची कमेंट करेल असं वाटत नव्हतं. अशातच हा फोटो पाहून एका महिलेनं अभिनंदन छोटू अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. बहुदा टाटांची फिरकी घेण्याच्या उद्देशानं तिनं ती प्रतिक्रिया दिली असावी. पण तिच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर एकच भडका उडाला होता. सोशल मीडियावर नेटकरी तिला नाही नाही त्या शिव्या घालत ट्रोल करत होते. अशा वेळी एक कॉमेंट करून रतन टाटांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. ती कॉमेंट आज पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. चला पाहूया काय म्हणाले होते रतन टाटा?

Indian businessmen rata tata
भारताच्या प्रगतीसाठी अतूट बांधिलकी, प्रमुख उद्योगपतींकडून रतन टाटा यांना आदरांजली
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन

महिलेला केले जाणारे ट्रोल वाढू देण्याऐवजी, रतन टाटा यांनी स्वत: मध्ये हस्तक्षेप करून उत्तर दिले. रतन टाटा महिलेच्या कमेंटला उत्तर देताना “प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मुलं लपलेलं असतं. कृपया त्या महिलेचा अनादर करू नका.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. अन् काय सांगता ही कमेंट करताच नेटकऱ्यांनी एका एकी ट्रोलिंग थांबवलं. एवढंच नाहीतर त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्टोरीला नेटकऱ्यांना “महिलेला ट्रोल करणं थांबवा तिला तिची चूक लक्षात आली आहे आणि ती यापुढे असं करणार नाही” असं मला सांगितलं असल्याचं रतन टाटा यांनी सांगितल. अगदी शेवटपर्यंत रतन टाटा हे नम्र राहिले याचे अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> Ratan Tata Death: अशी मैत्री पुन्हा होणे नाही! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचेच डोळे पाणावले

नेटकरीही आता यावर प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “रतन टाटा तुम्ही ग्रेटच आहात, कितीदा मन जिंकाल” तर आणखी एकानं, “असा व्यक्ती पुन्हा होणे नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.