Ratha Saptami 2025: माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. हा दिवस संपूर्ण भारतात सूर्य देवाची जयंती म्हणून साजरी केला जातो. माघ सप्तमी, माघ जयंती आणि सूर्य जयंती या इतर नावांनी देखील ओळखले जाते. आज (४ फेब्रुवारी) रोजी साजरी केली जात असून धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा-आराधना केली जाते. तसेच अर्घ्य अर्पण केले जाते. रथ सप्तमीला दान केल्याने पाप आणि रोगांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते. यासह उत्तम आरोग्याचे वरदान प्राप्त होते.

रथ सप्तमीला सूर्याची पूजा कशी करावी?

माघ शुक्ल सप्तमी (रथ सप्तमी) या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याचे दर्शन घ्यावे. यानंतर ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करत जल अर्पण करा.

happy ratha saptami wishes
Ratha Saptami Wishes : आज रथ सप्तमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा; पाहा यादी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Daily Horoscope 4 February 2025
Daily Horoscope : रथ सप्तमीला सूर्यदेव धरणार ‘या’ राशींवर कृपेचे छत्र; कोणाला नोकरी, व्यवसायात फायदा तर कोणाला मिळेल कौटुंबिक सुख
Indian Migrants in America
Indian Migrants : अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या भारतीयांची मायदेशी पाठवणी? लष्कराचे विमान भारताकडे रवाना
Aaradhya Bachchan
ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; नेमकं प्रकरण काय?
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Gemini Horoscope today
Gemini Horoscope Today : अचानक धनलाभाचा योग अन् नोकरी- व्यवसायात यश, मिथुन राशींच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

सूर्यदेवाला जल अर्पण करताना पाण्यात लाल रोळी आणि लाल फुले टाकावीत.

जल अर्पण केल्यानंतर लाल रंगाच्या आसनावर बसावे. यानंतर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते। अनुकम्पय मां भक्त्या गृहणाध्र्य दिवाकर’या मंत्राचा १०८ वेळा जप करा.

सूर्याला जल अर्पण केल्यानंतर रथ सप्तमीला तुपाचा दिवा लावून पूजा करावी.

रथ सप्तमीला सूर्य सहस्रनाम, सूर्यशक्ती आणि गायत्री मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

रथ सप्तमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

माघ महिन्यातील सप्तमीला पवित्र नदीत स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे आणि दिवा दान करणे शुभ मानले जाते. रथ सप्तमीच्या दिवशी केलेल्या दानाचा उल्लेख भविष्य पुराणातही आहे. पौराणिक कथेनुसार, एका गणिकाने ऋषींनी निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार सूर्याची उपासना केलली, यानंतर त्याला अप्सरांचा प्रमुख होण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. असे मानले जाते की, सूर्य बलवान असेल तर करिअर आणि व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. सरकारी नोकरीसाठी सूर्य बलवान असणं गरजेचं आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळविण्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केले पाहीजे.

आज गुगल ट्रेंडवरही रथ सप्तमी २०२५ हा कीवर्ड ट्रेंड होत आहे, मागील ४८ तासांमध्ये १० हजाराहून अधिक लोकांनी हा शब्द सर्च केला आहे.

(फोटो सौजन्य: google trends)

रथ सप्तमी तिथी आणि शुभ मुहूर्त

सप्तमी तिथी: ४ फेब्रुवारी, मंगळवार, पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपासून सुरू झाली

सप्तमी तिथी समाप्त: ५ फेब्रुवारी, बुधवार, मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

राहू काळ: दुपारी ३ पासून ४: ३० पर्यंत असेल.

रथ सप्तमीला स्नानाचा मुहूर्त: ४ फेब्रुवारी, पहाटे ५ वाजून २३ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल.

अर्घ्यदान वेळ: सूर्योदयानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता.

रथ सप्तमीचा शुभ मुहूर्त: विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल.

रथ सप्तमीचा खास संयोग: सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत सर्वाथ सिद्धी योग निर्माण होत आहे.

Story img Loader