नुकताच देशभरामध्ये दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात अनेक ठिकाणी रामलीलाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ही परंपरा गेल्या अनके वर्षांची आहे. कित्येकदा रामलीलाचे यशस्वीपणे आयोजन होते पण कित्येकदा ऐनवेळी काही ना काही गोंधळ होतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरणे अशक्य झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक रावण आपल्या बाइकवरून स्ट्रेजवर एंट्री करतो आणि स्टेजवर येताच नाचू लागतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ पाहा
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, रावण कशाप्रकारे बाईकवरून स्टेजवर एँट्री घेतो. त्यानंतर लोक टाळ्या वाजवत त्याचे स्वागत करतात. व्हिडीओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हा रावण स्टेजवर उभे राहून नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाहीये.

हेही वाचा – हेल्मेट घालून, म्हशीवर बसून ऐटीत रस्त्यावर फिरतोय हा तरुण; व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना आवरेना हसू

हेही वाचा – जुगाड असावा तर असा! बाईकपासून तयार केली विचित्र सायकल, व्हायरल व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

व्हिडीओ ट्विटरवर @navsekera नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. व्हिडीओ आतापर्यंत ५६ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व्हिडीओवर कित्येक लोकांना कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हा कसा रावण आहे यार” तर दुसऱ्याने लिहिले की, “कलयुगी रावण आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravana came with a bullet on the stage and started dancing on the stage video goes viral snk