आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यास सांगितलं आहे. ही तसं पाहायला गेलं तर नोटबंदी नसली तरी यामुळे अनेक व्यवसायिक आणि लोकांना धक्का बसला आहे. नोट बदलण्यासाठी सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला या नोट बदलता येणार नाही.त्यामुळे सर्वच व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या नोटा खर्च करत आहेत. अशातच काही पेट्रोल पंपांवर दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंद केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशमधील एका पेट्रोल पंपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी चक्क २ हजाराची नोट घेण्यास मानई केली आहे. एवढच नाही तर गाडीत भरलेलं पेट्रोलही काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

पेट्रोल पंपावर 2000 रु. ची नोट घेण्यास नकार

तर झालं असं की, हा व्हिडीओ जालौनच्या ओराई कोतवाली भागातील बी मार्टसमोरील हिंदुस्थान पेट्रोल पंपावरील आहे. इथे एक तरुण स्कूटी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने ४०० रुपयांचे पेट्रोल भरले व २००० रुपयांची नोट दिली. मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने ही नोट घेण्यास नकार दिला. तरुणाकडे फक्त २००० रुपयांचीच नोट असल्याने कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या गाडीत भरलेले पेट्रोल पुन्हा काढून घेतले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पुणेकरांनो रस्त्याच्या कडेला गाडी थांबवताय? हा भयानक अपघाताचा CCTV Video पाहून व्हाल थक्क

तुम्हाला जर २ हजाराच्या नोटा बदलायच्या असतील तर, पॅनकार्ड द्यावं लागणार आहे. मात्र ही अट सगळ्यांना लागू होणार नाही. ज्यांना २० हजार रुपयांच्या वर पैसे एक्सचेंज करायचे आहेत त्यांच्यासाठी ही अट असणार आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी पैसे बदलून घेणाऱ्यांना बँकेतून थेट पैसे बदलून मिळणार आहेत.