देशात पहिल्यांदाच २०० रूपयांची नोट चलनात येणार असल्याची घोषणा नुकतीच रिझर्व्ह बँकेने ऑफ इंडियाने केली होती. ही नोट अखेर शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी बॅंकांमध्ये दाखल झाली आणि नोटा मिळविण्यासाठी देशभरातील नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली. या नोटा आपल्याला सगळ्यात आधी मिळाव्यात यासाठी नागरिकांची धडपड सुरु असल्याचे पहायला मिळाले.

१०० आणि ५०० रुपयांच्या मधील मूल्याची नोट देशात पहिल्यांदा आल्याने त्याबाबत सामान्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या २०० रुपयांच्या नोटेचा नमुनाही नुकताच साार्वजनिक करण्यात आला होता. ही नोट सप्टेंबर महिन्यात चलनात आणली जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र त्याआधीच ती चलनात आल्याने नागरिकांनी उत्सुकतेने बॅंकेत जाऊन या नोटा मिळविण्यासाठी रांगा लावल्या.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gold crown stolen from Pune, Zaveri Bazar, Pune,
पुण्यातून चोरलेल्या सोन्याच्या मुकुटाची मुंबईतील झवेरी बाजारात विक्री
Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश

२०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात; जाणून घ्या कशी असेल !

दुसरीकडे ज्यांना ही नोट मिळाली त्यांनी सोशल मीडियावर आपले २०० रुपयांच्या नोटेबरोबरचे फोटो आणि त्याविषयीची आपली मते व्यक्त केली आहेत. अनेकांनी अशाप्रकारे ५०० रुपयांहून कमी किंमतीची नोट आल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. तर इतरांनी यो नोटेच्या रंगावरुन आणि चलनाविषयीच्या एकूण सरकारच्या धोरणावरुन सरकरची खिल्लीही उडवली असल्याचे पहायला मिळत आहे.

या नोटेचा नेमका रंग कोणता याविषयांच्या चर्चेलाही उधाण आले होते. केशरी रंगातील ही नोट मोदीजी तुम्ही निऑन रंगातही काढा ना असेही एकाने ट्विट केले आहे. इंटरनेटवर या नोटेचे वेगवेगळे रंग फिरत असून त्याचा मूळ रंग केशरी रंगाच्या जवळ जाणाराच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय आता ९ आणि ९९ रुपयांची नोटही काढा कारण दुकानदार सुटे पैसे देत नाहीत आणि विनाकारण चॉकलेट खावे लागते असेही एकाने म्हटले आहे. याआधी नोटाबंदीनंतर २००० रुपयांची नोट बाजारात आल्यावरही अनेकांनी आपले या नोटेसोबतचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅप यांसारख्या सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

Story img Loader