वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो.त्यामधील २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. गुगलने याबाबत डुडलही बनवलं आहे. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी २१ डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते.
आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. २५ डिसेंबर पासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.
२१ डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.
विंटर सोलस्टाइस जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चीनमध्ये आजचा दिवस पॉझिटीव्ह अॅनर्जीचा दिवस समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात. पाकिस्तानमधील नॉर्थ वेस्टर्न भागातील आदिवासी जमाती या दिवशी उत्सव साजरा करतात. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात आजच्या दिवशी द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो.