Viral Video : असं म्हणतात, गरजूंना मदत करणे यापेक्षा सुंदर कोणतेही पुण्य नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणार्या गरजू लोकांना मदत करणे खूप गरजेचे आहे. सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा किंवा सहकार्य करण्याचा संदेश दिला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल जो रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करताना दिसत आहे. या गरजू चिमुकल्याला एक इन्फ्लुअन्सर तरुण कसा मदत करतो, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल. हा चिमुकला रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करताना दिसत आहे. त्याला अभ्यास करताना पाहून एक इन्फ्लुअन्सर तरुण त्याच्याजवळ जातो आणि त्याला एक सुंदर लाल रंगाची बॅग देतो. तरुणाने दिलेली बॅग पाहून तो खूप खूश होतो. अभ्यास झाल्यानंतर जेव्हा तो पुस्तक त्या बॅगमध्ये ठेवायला जातो तेव्हा त्या चिमुकल्याला त्यात एक लिफाफा दिसतो. त्या लिफाफ्यामध्ये पैसे असतात. या चिमुकल्याला वाटते की हे पैसे चुकून आले म्हणून तो लगेच जागेवरून उठतो आणि त्या तरुणाला शोधतो पण आजुबाजूला कुठेच तरुण दिसत नाही. तेव्हा हा चिमुकला जागेवर येऊन बसतो आणि आकाशाकडे हात जोडत देवाचे आभार मानतो आणि तिथून निघून जातो. हे पैसे त्या इन्फ्लुअन्सर तरुणाने ठेवलेले असते. त्या लिफाफ्यावर लिहिलेले असते “तुझ्या अभ्यासाठी भाऊ” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक हा व्हिडीओ पाहून भावुक होतील.
पाहा व्हायरल व्हिडीओ
street__helper या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला फक्त काहीतरी करण्यासाठी आवड हवी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप चांगले माणूस आहात” तर एका युजरने लिहिलेय, “मन जिंकले भावाने” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकाने अशी मदत करायला पाहिजे” एक युजर लिहितो, “व्हिडीओ खूप सुंदर आहे पण स्क्रिप्टेड आहे” तर एक युजर लिहितो, “दुसऱ्यांचे चांगले कराल तर तुमचेही चांगले होईल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काही युजर्सनी हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचे लिहिलेय.