Army Man Rescued Choking Kid : तुमच्या अडचणीच्या काळात कधी कोण तुमच्यासाठी धावून येईल काही सांगता येत नाही. काही वेळा अशी एखादी घटना घडते की, तेव्हा तुमच्या मदतीला ओळखीचे कोणी बरोबर नसते. असल्यास त्यांनाही काय करावे सुचत नाही. अशावेळी गर्दीत एखादा चेहरा तुमच्यासाठी देवासारखा धावून येतो आणि तुमचे प्राण वाचवतो. माणसांच्या गर्दीतील अशाच एका अज्ञात नायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याच्यामुळे एका चिमुकलीचा जीव वाचू शकला. युजर्स या नायकाच्या पराक्रमाला आता सलाम करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रेस्टॉरंटमध्ये काही लोक खाण्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत, तर अनेक लोक रेस्टॉरंटच्या काउंटरजवळ आपली पाळी येण्याची वाट पाहत रांगेत उभे आहेत. यावेळी तिथे बसलेली एक महिला अचानक घाबरलेल्या स्थितीत उठून आपल्या चिमुकलीला फिरवताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार, खाताना चिमुकलीच्या घशात काहीतरी अडकले, ज्यामुळे तिला गुदमरल्यासारखे झाले. तिला श्वास घेता येत नव्हता. अशा परिस्थितीत चिमुकलीच्या आईला काय करावे सुचत नव्हते, तरीही ती मुलीला उचलून तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
shaktimaan arriving soon mukesh khanna
भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या

Video: लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान पत्रकाराने स्वत:च्याच चेहऱ्यावर मारली चापट, कारण वाचून हसू होईल अनावर

यावेळी चिमुकलीची अवस्था पाहून आजूबाजूचे लोकही काळजीत पडले. इतक्यातच गर्दीतून एक व्यक्ती पुढे येतो आणि चिमुकलीला आईच्या हातून घेतो. यानंतर तिला हातावर उलटी पकडून पाठीवर थोपटतो. यानंतर काही क्षणातच चिमुकली ठीक होते, ज्यानंतर आईदेखील सुटकेचा नि:श्वास सोडते. चिमुकलीचा प्राण वाचवण्यासाठी हा व्यक्ती गर्दीतून अगदी देवासारखा धावून आला होता.

@sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जुनियर हिल्टन रॅटियर हा फायरफायटर आहे, त्याने एका वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. या घटनेवेळी ही छोटी मुलगी आई आणि आपल्या कुटुंबासह एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होती. यावेळी जुनियर हिल्टन रॅटियर या सुट्टीवर असलेल्या आर्मी जवानाने त्वरित धाव घेत चिमुकलीचे प्राण वाचवले. यावेळी ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या आर्मी ऑफिसरला खरा देवदूत असल्याचे म्हटले आहे, तर काही जण हा सुपरहिरो असल्याचे म्हणत आहेत.