Viral Video : भुताशी संबंधित अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा प्रत्यक्षात भूत पाहिल्याचा दावा अनेक जण करतात. सर्बियामध्येही असेच एक प्रकरण उघडकीस आले आहेत. या देशात एक महिला भूत बनून रस्त्यावर फिरत आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेला लोक Serbian Dancing Lady म्हणून संबोधतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही महिला पहिल्यांदाच रस्त्यावर दिसली नाही तर याआधीही ती अनेकदा लोकांना दिसली आहे. २००९ या वर्षी पहिल्यांदा ती लोकांना रस्त्यावर दिसली होती तर काही रिपोर्ट्सच्या मते ही महिला १९९८ पासून रस्त्यावर फिरत आहे तर काही रिपोर्ट्सच्या मते, २०१८ मध्ये ही महिला दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा २०२३ मध्ये ही महिला काही लोकांना दिसली आहे. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा : “पाऊले चालती पंढरीची वाट…” पुणे पोलिसांनी शेअर केला वारीचे दर्शन घडवणारा अप्रतिम Video
या व्हायरल व्हिडीओमुळे सर्बियामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही महिला रात्री अंधारात रस्त्यावर डान्स करते. या महिलेची एक युनिक डान्स स्टेप आहे आणि या डान्स स्टेपवरच ती नाचते. जो तिला डान्स करताना बघतो, त्या व्यक्तीवर ती हल्ला करते, अशी अफवा आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेला पोलिसांनी पकडले होते, असे म्हणतात पण यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : रसगुल्ला भरवणे पडले महागात, नवरदेवाला भर मांडवात नवरीने चोपले!
सर्बियामध्ये या महिलेशी निगडित एक कहाणी चर्चेत आहे. असे मानले जाते की सर्बियामध्ये एका गावात एक तरुणी राहायची. तिचे दुसऱ्या गावातील मुलावर प्रेम होते. मात्र तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या या नात्याला नकार दिला तेव्हा या तरुणीने आपला जीव दिला. तिचे हे भूत आता रस्त्यावर फिरत असते, असेही लोक मानत आहेत.