Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकत्र दिसत आहे. तुम्हाला वाटेल, यांची भेट कधी झाली? पण जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की खरंच शाहरुख खान मोदींना भेटला का? हा तुमचा भास आहे की आणखी काही, यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकमेकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहे पण जेव्हा तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा खरा शाहरुख नाही आणि हे खरे नरेंद्र मोदी नाहीत. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे पण हे खरं आहे. व्हिडीओ चांगल्याने पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल.
शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी सारखे दिसणारे हे कोण आहेत?
शाहरुख खान सारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव इब्राहिम कादरी आहे. इब्राहिम हुबेहूब शाहरुख खान सारखा दिसतो. सोशल मीडियावर तो अनेक शाहरुखच्या अंदाजात व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. नरेंद्र मोदी सारखे दिसणारे हे गृहस्थ सुद्धा मोदींचे डुप्लीकेट आहेत. या व्हिडीओमध्ये खरे नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान नाहीत.
हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्याची पोर! वडील देताहेत चिमुकलीला शेत नांगरण्याची ट्रेनिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ
ibrahim__qadri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडिया वाले” या व्हिडीओवर “इंडिया वाले” गाणे सुद्धा लावले आहे.
हा व्हिडीओ पाहून लोकांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला वाटले हे दोघेही खरे व्यक्ती आहेत” अनेक युजर्स यांना पाहून अवाक् झाले आहेत.