Realme 14 Pro India Launch : नवनवीन कंपन्या अधूनमधून बाजारात त्यांचे स्मार्टफोन लाँच करत असतात. अशातच रिअलमी कंपनी त्यांची रिअलमी १४ प्रो ५ जी सीरिज घेऊन मार्केटमध्ये उतरली आहे. त्याचमुळे गूगल ट्रेंडवर ‘रिअलमी १४ प्रो’ (Realme 14 Pro) टॅग सध्या ट्रेंड होताना दिसत आहे. रिअलमी १४ प्रो ५ जी सीरिज बेस आणि प्लस व्हेरिएंटसह जानेवारीमध्ये भारतात लाँच होणार आहे. कंपनीने ही सीरिज भारतात कधी लाँच करणार याची तारीखदेखील जाहीर केली आहे. त्याचबरोबर कॅमेरा, बॅटरी, चिपसेटसह काही प्रमुख फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. ‘टिपस्टर’ने रिअलमी १४ प्रो ५ जी (Realme 14 Pro 5G) व रिअलमी १४ प्रो प्लस ५ जी (Realme 14 Pro+ 5G) चे काही लीक झालेली प्रमोशनल पोस्टर्स शेअर केली आहेत. या पोस्टर्समधून काही फीचर्ससुद्धा सांगितली जात आहेत.
भारतात कधी होणार लाँच? (Realme 14 Pro 5G Series India Launch)
द रिअलमी १४ प्रो ५ जी सीरिज १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भारतात लाँच होईल. पर्ल व्हाईट, सुएड ग्रे शेड्सबरोबर इंडिया एक्स्ल्युसिव्ह बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक कलर या पर्यायांमध्ये ऑफर केले जाणार आहेत. स्मार्टफोन १.६ मिमी थिन बेझलसह १.५ के क्वाड-वक्र डिस्प्ले असणार आहे. कंपनीचा दावा आहे की, Realme 14 Pro 5G लाइनअपमध्ये सेगमेंटमधील सर्वांत स्लिम बेझल्सचा समावेश असेल आणि जगातील पहिले ट्रिपल फ्लॅश युनिट असेल. हे फोन देशात फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडिया ई-स्टोअरवरून खरेदीसाठी उपलब्ध असतील.
फीचर्स
टिपस्टर पारस गुगलानी (Tipster Paras Guglani) यांनी त्यांच्या @passionategeekz या अकाउंटवरून १४ प्रो ५ जी आणि रिअलमी १४ प्रो प्लस ५ जीची लीक झालेली पोस्टर्स शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये असे दिसून येते की, बेस मॉडेल MediaTek Dimensity 7300 Energy chipset द्वारे समर्थित असेल आणि 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसरीकडे प्लस व्हेरियंटला स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 SoC दिले जाईल आणि 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे Realme 14 Pro 5G ला F/1.8 अपेर्चर आणि ४के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्टसह ओआयएस OIS सपोर्टेड ५० मेगापिक्सेल Sony IMX882 प्राथमिक सेन्सर मिळेल. त्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल.
दरम्यान, Realme 14 Pro+ 5G ला ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर, ५० मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेऱ्याबरोबर ५० मेगापिक्सेलचा मेन रिअर सेन्सर आणि ११२ डिग्री अल्ट्रावाइड शूटर मिळेल. तसेच या सीरिजमध्ये ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि १/२ इंच, ५० मेगापिक्सेल Sony IMX882 टेलिफोटो शूटर 3x ऑप्टिकल झूम, 6x लॉसलेस झूम व 120x डिजिटल झूम सपोर्ट करणार आहे.
कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी
Realme 14 Pro 5G सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी पॅकसह येतील. दोन्ही स्मार्टफोन पाणी, धूळ पासून संरक्षण करण्यासाठी IP66, IP68 आणि IP69 रेट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग टेक्नॉलॉजीसह सुसज्ज असतील, जे फोनच्या पर्ल व्हाईट प्रकाराला १६ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमानाच्या संपर्कात असताना व्हायब्रंट ब्लू पॅटर्न प्राप्त करण्यास एनेबल होण्यास मदत करतील.