Realme Narzo 80x To Be Priced: Realme ने Realme Narzo 80x आणि Narzo 80 Pro लाँच करून त्यांच्या Narzo मालिकेतील स्मार्टफोन्सचा विस्तार केला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स मीडियाटेक चिपसेटवर चालतात आणि अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. या दोघांमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे आणि त्यांना 6000 mAh बॅटरी आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि डिटेल्स.

Realme Narzo ८०x दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – ६GB+१२८GB आणि ८GB+१२८GB. याची किंमत अनुक्रमे १३,९९९ रुपये आणि १४,९९९ रुपये आहे. लाँच ऑफरचा भाग म्हणून, कंपनी १,५०० रुपयांची सूट देत आहे. ग्राहक ११ एप्रिलपासून स्मार्टफोन खरेदी करू शकतात. दुसरीकडे, Realme Narzo ८० Pro तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – ८GB+१२८GB, ८GB+२५६GB आणि १२GB+२५६GB. याची किंमत अनुक्रमे १९,९९९ रुपये, २१,४९९ रुपये आणि २३,४९९ रुपये. ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर २,००० रुपयांची सूट मिळू शकते. Realme Narzo ८० Pro ८ एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. दोन्ही स्मार्टफोन Realme.com आणि Amazon.in वर ऑनलाइन उपलब्ध असतील.

realme Narzo 80x 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमीनं दिलेल्या माहितीनुसार, नारजो ८० एक्स 5जी फोन MediaTek Dimenisty ६४०० ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लाँच केला जाईल. फोनची बॅटरी याची मोठी खासियत असेल. पावर बॅकअपसाठी या मोबाइलमध्ये तगडी ६,०००mAh ची टायटेनियम बॅटरी दिली जाईल जी चार्ज करण्यासाठी ४५W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. हा रियलमी मोबाइल १२०Hz रिफ्रेश रेट असलेल्या पंच-होल अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाईल आणि यात military-grade बॉडी तसेच IP६९ रेटिंग मिळेल.

realme Narzo ८० Pro ५G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी नारजो ८० प्रो एक हा गेमिंग फोन असेल. ज्यात MediaTek Dimensity ७४०० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. कुलिंगसाठी यात ६०५०mm² लार्ज वीसी कूलिंग सिस्टम देण्यात येईल. या फोनमध्ये BGMI ९०fps वर खेळता येईल आणि मोबाइलमध्ये २५००Hz इंस्टंट टच सॅम्पलिंग रेट मिळेल. पावर बॅकअपसाठी या रियलमी ५जी फोनमध्ये ८०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह ६,०००एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. युजर्सना या मोबाइलमध्ये कर्व्ड अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळेल जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४५००निट्स ब्राइटनेस आउटपुट देईल.