Viral news: आई-वडिलांचा कृपा, अण्णांची कृपा, पप्पांची कृपा, देवीची कृपा, देवाची कृपा, यांसारख्या ”टिंबटिंबची कृपा’वाल्यापाट्या रिक्षा-टॅक्सी-ट्रकच्या मागे हमखास दिसतातच! काही प्रमाणात ही अशीच नावं घरांना दिल्याचंही दिसतं. त्यातचही आपल्या व्यवसायाचं नाव देऊन त्याची कृपा मानण्यात धन्यता मानणारा अवलिया अजूनतरी पाहण्यात आलेला नाही. म्हणजे रिक्षावाल्यानं कधी आपल्या बंगल्याचं नाव रिक्षाची कृपा असं ठेवल्याचं पाहिलंय का कधी तुम्ही? किंवा अगदी एका मंत्र्याच्या बंगल्याचं नाव राजकारणीच कृपा पाहिलंय का कुठं? नाही ना? त्यामुळेच ज्या बंगल्याच्या नावाची आपण वाह वाह करतो, ते खास आहे. बदलापुरातील एका माणसानं आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राचं नाव बंगल्याला देऊन अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या स्वप्नातलं घरं कसं असावं, त्याचा कलर, इंटेरिअर कसं असावं तसेच सोबत आपल्या घराला काय नाव द्यावं हेसुद्धा अनेकांनी ठरवलेलं असंत. अशातच या पठ्ठ्यानी आपल्याला घराला दिलेल्या नावाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

‘शेअर मार्केटची कृपा’

आपल्याला जे क्षेत्र यश मिळवून देतं, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. बदलापुरात एका व्यावसायिकाने शेअर मार्केटमधून मिळालेलं यश आणि आर्थिक सुबत्तेनंतर कृतज्ञता म्हणून चक्क बंगल्याचं नावच ‘शेअर मार्केटची कृपा’ असं ठेवलं आहे. या अनोख्या बंगल्याची सध्या बदलापुरात मोठी चर्चा सुरू आहे. मुकुंद खानोरे असे या तरुण व्यावसायिकाचं नाव आहे. मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरला राहणारे रहिवासी असून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती. त्यानंतर या क्षेत्रात जम बसवत त्यांनी यश मिळवलं आहे. आज खानोरे हे शेअर मार्केटच्या जोरावर कोट्यधीश बनले आहेत. त्यांनी बदलापूरजवळच्या कासगावमध्ये मोठी खुली जागा विकत घेतली. या जागेवर त्यांनी मोठी बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव त्यांनी ‘शेअर मार्केटची कृपा’ असं ठेवल आहे.

पाहा फोटो

हेही वाचा >> “तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच

कृतज्ञतेची नागरिकांमध्ये चर्चा

आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टीमुळे यश मिळतं, त्या गोष्टीप्रती कृतज्ञता अनेक जण व्यक्त करत असतात. पण शेअर मार्केट बद्दलच्या या कृतज्ञतेची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reason behind keeping name of bungalow asshare marketchi krupa in badlapur photo goes viral srk