भारतीयांच्या खाण्याच्या पद्धती किती निराळ्या आहेत ना! म्हणजे बघा ना पावलोपावली आपल्याला खाद्यसंस्कृती बदलताना दिसेल. कुठे शाकाहारी कुठे मासांहारी, कुठे नारळाचा वापर जास्त तर कुठे तेलाचा तर कुठे मसाल्यांचा. तर अशा विविध चवी असणाऱ्या भारतीयांची न्याहारीच्या बाबातीत मात्र एका पदार्थाला खूप जास्त पसंती आहे, तेव्हा न्याहारी म्हटलं की त्या पदार्थाशिवाय भारतीयांचं पानच हलत नाही, आता तुम्हालाही उत्सुकता असेल कोणता बरं हा पदार्थ आहे ज्याने भारतीय जिभेचे उत्तम चोचले पुरवले आहेत.

तर हा पदार्थ म्हणजे डोसा बरं का! ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने एक सर्वेक्षण केलं, या सर्वेक्षणानुसार मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली यासारख्या शहरांतील लोक न्याहारीसाठी डोसाला सर्वात जास्त पसंती देत असल्याचे समोर आले आहे. डोसानंतर पराठा किंवा पोहे देखील भारतीयांचे आवडीचे पदार्थ असल्याचे या सर्वेमधून समोर आले आहे. दिल्लीमध्ये इतर शहरांपेक्षा हे चित्र थोडं वेगळं आहे इथे छोले भटुरेला जास्त पसंती आहे. तर मुंबईकरांना मात्र पोहे, डोसासोबत बन मस्का, पावही खाणं जास्त आवडतं. देशातल्या आठ शहरातील १ हजारांहून अधिक हॉटेलमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलाय.

dosa-670

Story img Loader