“अतिघाई संकाटात नेई” म्हणतात ते उगाच नाही. रस्त्यावरून लोक सुसाट वेगाने वाहन चालवताना दिसतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो की,’एवढी कसली घाई असते की लोकांना स्वत:च्या जीवाची देखील पर्वा नसते? भरधाव वेगावरील नियंत्रण सुटल्याने अनेकदा थरारक अपघात होतात आणि लोक आपला जीव गमावतात. वेगात वाहन चालवणाऱ्या या लोकंना स्वत:च्या जीवाची पर्वा नसते पण ते दुसऱ्यांच्या जीवाचीदेखील पर्वा करत नाही. सोशल मीडियावर अशा थरारक अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक कार आणि दुचाकीच्या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओ पाहून लक्षात येते की, हा व्हिडिओ एका इमारतीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे. इमारतीच्या समोर एक गेट दिसते आहे. गेटसमोर एक वळण दिसते आहे जेथून प्रथम एक कार सावकाशपणे येताना दिसते. जशी ती कार वळते तसे समोरील बाजूने सुसाट वेगाने दुचाकीस्वार येताना दिसतो. कारचालत तेथेच ब्रेक मारतो पण दुचाकीस्वार भरधाव वेगात येतो आणि थेट कारला धडकतो. तो इतक्या वेगात येतो की धडक बसताच तो दुचाकीसह हवेत फेकला जातो. दुचाकी एकीकडे पडते आणि तो दुचाकीस्वार कारला धडकून जोरात जमिनीवर आपटतो. अपघातानंतर लगेच आजुबाजूचे लोक जमा होतात. कारमधील चालकही उतरतो आणि जमिनीवर पडलेल्या दुचाकीस्वाराला उठवण्याचा प्रयत्न करतात. दुचाकीस्वाराचे नक्की काय झाले हे व्हिडिओमध्ये दिसत नाही.

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर @MamtaTripathi80 नावाच्या खात्यावरून पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”मित्रा, वेगासाठी इतका काय तो वेडेपणा… जीव धोक्यात टाकण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचा विचार करा. थोडे स्वार्थी व्हा कारण जीव आहे तर सर्व काही आहे. व्हिडिओ लखनऊ येथील आहे.”

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लखनऊ पोलिसांनी व्हिडीओवर कमेंट करत सांगितले की,” या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि प्राथमिक उपचारानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला घरी नेले आहे. इतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.”

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहले की, कारवाल्याची काही चूक नाही. चूक दुचाकीस्वाराची आहे जो इतक्या वेगात येत होता. आता त्याचे लायसेन्स विमा, आरसी सर्व काही चेक केले पाहिजे, त्याच्याकडे नसेल तरी सरकारने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.

दुसऱ्यानेही कमेंट केली की, “कारवाल्याची काहीच चूक नाही”

तिसरा म्हणाला की, “पूर्ण चूक दुचाकीस्वाराची आहे”