सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. ब्राझीलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गमतीत इतकी लाल मिरचीचा इतका वास घेतला की आता तिचा जीव धोक्यात आला आहे. मिरचीचा वास घेतल्याने एवढी वाईट आणि भयंकर शिक्षा भोगावी लागेल याचा विचारही त्या महिलेने केला नव्हता. थाईस मेडीरोस ही ब्राझिलियन महिला आहे. थाई गेल्या ६ महिन्यांपासून रुग्णालयात प्रकृतीने त्रस्त आहे. थाईच्या मेंदूला गंभीर सूज असल्याचे निदान झाले आहे, त्यामुळे तिला ६ महिन्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अॅनापोलिसमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय थाईसोबत यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक विचित्र घटना घडली होती. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत घरी जेवण बनवत होती तेव्हा तिला लोणच्याच्या मिरच्यांचा वास आला, जो खूप मसालेदार होता. त्यावेळी तिने ते नाकाला लावले. यावेळी तिला कल्पनाही नव्हती की तिला याचे गंभीर परिणाम पुढे भोगावे लागतील. यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली. आधी तिच्या घशाला खाज सुटू लागली, त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं. मग त्रास वाढल्यावर तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं.

हेही वाचा >> Drugs Video: धावत्या विरार लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा प्रताप पाहून यूजर्स संतापले

तिथे तपासणी केली असता महिलेच्या मेंदूला सूज असल्याचं समोर आलं, ज्याला एडिमा असं म्हटलं जातं. त्याच तिखट मिरचीमुळे ही सूज आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महिलेनं अनेक दिवस कोमातही घालवले. तिची आई अॅड्रियाना म्हणाली की, माझ्या मुलीला आधीच ब्राँकायटिस आणि दमा यासह अनेक आजार आहेत. अशा स्थितीत मेंदूला सूज आल्याने समस्या गंभीर बनली. तिने पुढे सांगितलं, की ३१ जुलै रोजी महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आलं, परंतु त्यानंतर तिला खूप ताप आला, त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं.