सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात . कधी मजेदार व्हिडीओ लोकांना हसवतात तर कधी भावनिक व्हिडीओ लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. त्याच वेळी, असे काही व्हिडीओ आहेत जे खूपच आश्चर्यकारक आहेत. आजकाल असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तुम्ही मांजरी पाहिलीच असतील, जी खूप गोंडस असतात. ते कुत्र्यांनंतर जगातील सर्वात पाळीव प्राण्यांपैकी एक आहेत, परंतु तुम्ही कधी तीन डोळ्यांची मांजर पाहिली आहे का? होय, तीन डोळ्यांची मांजर सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका लहान मांजरीला आपल्या मांडीवर घेऊन आहे आणि ती कॅमेऱ्यासमोर तिचे डोळे दाखवत आहे. मांजरीच्या उजव्या डोळ्यात दोन बुबुळे दिसतात, जे पाहायला खरं तर खूपच विचित्र दिसते. तसे, मांजरीचा हा तिसरा डोळा सहसा दिसत नाही. नीट पाहिलं तर त्याच्या एका डोळ्यात दोन बुबुळ असल्याचं कळतं. तुम्ही अशा प्राण्यांबद्दल बऱ्याचदा ऐकलं असेल आणि जे दोन डोके आणि तीन-चार पाय घेऊन जन्माला येतात. अशा गोष्टी आश्चर्यकारक आहेत, कारण सहसा असे होत नाही.

( हे ही वाचा: राहुल गांधींनी ४१ हजारांचा टी-शर्ट घातला? भाजपच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावरही रंगली चर्चा)

तीन डोळ्यांच्या मांजरीचा व्हिडीओ येथे पहा

( हे ही वाचा: Video: मध्यरात्री भररस्त्यात जोडप्याने केला रोमँटिक डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल)

या तीन डोळ्यांच्या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर u/Alloth नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर ४०० हून अधिक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘मला आशा आहे की हे वेदनादायक नसावे, कारण ते पाहणे वेदनादायक दिसते आहे’, तर दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की ‘हे भयानक दिसते आहे’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reddit user shares video of a cat with third eyeball people shocked to see this gps