Girlfriend On Rent Viral Post : आत्तापर्यंत आपण घर, कार, कपडे, फर्निचर भाड्याने मिळतात हे ऐकून आहोत. इतकेच नाही तर लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी लोकही भाड्याने मिळतात हेही ऐकलं असेल, पण तुम्ही रोमँटिक डेटसाठी गर्लफ्रेंड भाड्याने मिळते हे कधी ऐकलं आहे का? तुम्हाला हे वाचून हसू येईल,पण परदेशात नाही तर आपल्या देशात असे घडत आहे. दिल्लीतील एका तरुणीने इन्स्टाग्रावर गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल अशी जाहिरात केली आहे, ज्यात तिने वेगवेगळ्या पद्धतींच्या डेटसाठी रेट लिस्ट ऑफर दिली आहे. यात अगदी रोमँटिक डेटपासून ते शॉपिंग, कुकिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी एक रेट देण्यात आला आहे. तरुणीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिव्या गिरी (@divya_giri__) नावाच्या तरुणीने इन्स्टाग्रामवर याबाबत एक रील पोस्ट केली आहे, ज्यात तिने १५०० रुपयांपासून १०,००० रुपयांपर्यंतच्या स्कीम ऑफर केल्या आहेत. दिव्याने यावर कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही सिंगल आहात? पण एखाद्या मुलीबरोबर डेटवर जाण्याची इच्छा आहे? तर मला डेटवर घेऊन चला, पण त्यासाठी तुम्हाला फक्त भाडे द्यावे लागेल.”
डेटसाठी मोजावे लागतील इतके पैसे
दिव्याने याबरोबर एक रेट लिस्ट शेअर केली आहे, त्यानुसार एका चिल कॉफी डेटसाठी तुम्हाला १५०० रुपये मोजावे लागतील. सामान्य डेटसाठी (डिनर आणि मूव्ही) तुम्हाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. मीटिंग विथ फॅमिलीसाठी तुम्हाला तीन हजार रुपये द्यावे लागतील. कोणत्याही कार्यक्रमात तिला बरोबर घेऊन जायचे असेल तर ३५०० रु. बाईक डेटसाठी (हात पकडणे आणि इतर.) ४००० रुपये भाडं द्याव लागेल. तुम्ही सोशल मीडियावर तिच्याबरोबरच्या डेटचे फोटो पोस्ट केले तर तुम्हाला ६००० रुपये द्यावे लागतील. एडवेंचर डेटसाठी ५००० रुपये, घरी एकत्र स्वयंपाक करण्यासाठी ३५०० रुपये, शॉपिंगसाठी ४५०० रुपये आणि वीकेंडला दोन दिवस एकत्र बाहेर जाण्यासाठी १०,००० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
पण, ही पोस्ट करणारी तरुणी खरोखर अशाप्रकारच्या डेट करत आहे की हे सर्व खोटे आहे याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
“झाड, बाथरुम, लादी, भांडी धुण्यासाठी किती पैसे द्याल’ युजर्सची कमेंट्स
आता या पोस्टवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘या तरुणीला ती जपानमध्ये आहे असे वाटतेय.’ अनेकांनी झाडू मारण्यापासून बाथरुम, लादी, भांडी धुण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील, अशी विचारणा करत तिची थट्टा उडवली आहे. कोणीतरी इन्स्टाग्राम सोडण्यासाठी किती पैसे घेशील असाही प्रश्न विचारला आहे. मजेशीर म्हणजे एका युजरने तर कॉलेजच्या असाइनमेंट पूर्ण करून देण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील, असा प्रश्न विचारला आहे; तर काहींनी हा हनीट्रॅप असून त्यात तरुणांनी अडकू नका असा सल्ला दिला आहे.
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
दरम्यान, हा ट्रेंड अलीकडे जपानमध्ये दिसून आला आहे, जेथे लोक एखाद्याला त्यांचा प्रियकर किंवा प्रेयसी म्हणून भाड्याने खरेदी करू शकतात. तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारच्या डेटवर जायचे असल्यास त्यानुसार वेगवेगळे दर घेतले जातात. डेटवर जाणे, एकत्र लंच किंवा डिनर डेटवर जाणे, एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे किंवा एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे; अशाप्रकारच्या डेट केल्या जातात. पण, जपानचा हा ट्रेंड आता भारतातही ‘एकटेपणाशी झगडणाऱ्या सिंगल्स’ लोकांसाठी आधार ठरत असल्याचे दिसतेय.