गेल्या काही दिवसांपूर्वी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा रामू साहू नावाचा दिव्यांग तरूण सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला नोकरी दिल्यामुळे झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव झाला होता. झोमॅटो कंपनीनं रामू साहूला एक भेट दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
झोमॅटोनं दिव्यांग असणाऱ्या रामू साहूला ईलेक्ट्रिक ट्राय-साइकल भेट दिली आहे. झोमॅटेचे निर्माते दीपिंदर गोयल यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबाबतची माहिती दिली. झोमॅटोसह त्यांच्यावरही नेटीझन्सही कौतुकांचा वर्षाव केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रामू साहूला एक ईलेक्ट्रिक ट्राय-साइकल भेट देण्यात आली आहे. रामूनं आनंदाने त्याचा स्वीकारही केला आहे. आता त्याला जेवण पोहचवणं सोप्प जाईल.
UPDATE: Our delivery partner Ramu Sahu has gracefully accepted the electric vehicle that we were keen on him having. pic.twitter.com/LrJp86tZ8h
— Deepinder Goyal (@deepigoyal) May 28, 2019
रामू साहूनं ईलेक्ट्रिक ट्राय-साइकल दिल्याबद्दल कंपनीला धन्यवाद म्हटले आहे. दीपिंदर गोयल यांनी रामूचा धन्यवाद म्हणतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.
And we are grateful that he is a part of our Delivery Universe. pic.twitter.com/aaP2NHhLZ3
— Deepinder Goyal (@deepigoyal) May 28, 2019
दरम्यान, १७ मे रोजी रामू साहू चर्चेत आला होता. हनी गोयल नावाच्या एका व्यक्तीने रामू साहूचा डिलिव्हरी करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली होती. दिव्यांगासाठी कमी ठिकाणी कामं असतात त्यामुळे त्यांना रोजगार मिळणे कठीण जाते. पण झोमॅटोने एका दिव्यांग मुलाला काम देऊन आत्मविश्वास वाढवला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.