गेल्या काही दिवसांपूर्वी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा रामू साहू नावाचा दिव्यांग तरूण सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला नोकरी दिल्यामुळे झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव झाला होता. झोमॅटो कंपनीनं रामू साहूला एक भेट दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोमॅटोनं दिव्यांग असणाऱ्या रामू साहूला ईलेक्‍ट्र‍िक ट्राय-साइकल भेट दिली आहे. झोमॅटेचे निर्माते दीपिंदर गोयल यांनी मंगळवारी रात्री उशीरा याबाबतची माहिती दिली. झोमॅटोसह त्यांच्यावरही नेटीझन्सही कौतुकांचा वर्षाव केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रामू साहूला एक ईलेक्‍ट्र‍िक ट्राय-साइकल भेट देण्यात आली आहे. रामूनं आनंदाने त्याचा स्वीकारही केला आहे. आता त्याला जेवण पोहचवणं सोप्प जाईल.

रामू साहूनं ईलेक्‍ट्र‍िक ट्राय-साइकल दिल्याबद्दल कंपनीला धन्यवाद म्हटले आहे. दीपिंदर गोयल यांनी रामूचा धन्यवाद म्हणतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे.

दरम्यान, १७ मे रोजी रामू साहू चर्चेत आला होता. हनी गोयल नावाच्या एका व्यक्तीने रामू साहूचा डिलिव्हरी करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली होती. दिव्यांगासाठी कमी ठिकाणी कामं असतात त्यामुळे त्यांना रोजगार मिळणे कठीण जाते. पण झोमॅटोने एका दिव्यांग मुलाला काम देऊन आत्मविश्वास वाढवला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember the differently abled delivery guy zomato just gifted him an electric vehicle