‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनरी चमचमता चांगला’
हे बालगीत म्हणताना किती मज्जा यायची. सर्वात आवडत्या चॉकलेटचा बंगला खरंच कोणीतरी बांधला तर किती मज्जा येईल हे सारखं वाटायचं. या गाण्यातील प्रत्येक ओळीवर आपलं कल्पनाविश्व विस्तारत जायचं. पण, आपल्या कल्पनेतलं खरंखुरं चॉकलेटचं टुमदार घर बांधण्याची किमया एका चॉकलेट आर्टिस्टनं साधली आहे. हे चॉकलेटचं घर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॅरिसमधल्या प्रसिद्ध चॉकलेट आर्टिस्ट जेन ल्युक डिक्ल्युझ्यूनं चॉकलेटचं एक मोठं घर बांधलं आहे. या घराच्या छप्परापासून ते भिंती आणि भांड्यांपासून ते पुस्तकं, फर्निचरदेखील चॉकलेटपासून तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे घर इतकं मोठं आहे की यात कोणीही राहू शकतं.

चॉकलेटच्या या आलिशान घरात राहण्याची संधी लोकांना देण्यात आली आहे. बुकिंग प्रक्रिया पार पाडल्यानंतर या चॉकलेटच्या घरात ठराविक दिवसांपुरता राहता येणार आहे. हे घर बांधण्यासाठी कलाकाराला जवळपास ६०० तास लागले तर घर बांधण्यासाठी १.५ टन चॉकलेट वापरण्यात आलं आहे.

या सुंदर चॉकलेटच्या घरात राहण्याची परवानगी जरी कलाकारानं दिली असली तरी यातलं चॉकलेट कितीही मोह झाला तरी न खाण्याची सक्त ताकीदही त्यानं दिली आहे.