भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष ‘आनंद महिंद्रा’ विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पोस्टमधून व्यवसाय, आर्थिक व जीवन याबद्दल अनेक प्रेरणादायी गोष्टी शेअर करताना दिसून येतात. तर काही तासांपूर्वी ‘जागतिक ईव्ही दिनानिमित्त’ (World EV Day) सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा समूहाच्या ‘पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाबद्दल’ एक गोष्ट सांगितली आहे; जी सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
पहिल्या तीनचाकी ईव्हीबद्दल बोलताना आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, ईव्ही खूप आधी आली होती; पण मागणीअभावी ती जास्त काळ टिकू शकली नाही. इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे दिग्गज नगरकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी याची डिझाइन केली होती. परंतु, तीन चाकी ईव्ही भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकली नाही. त्यानंतर या वाहनाने अवघ्या काही काळात निरोप घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा… भारताचं सौंदर्य आणखी खुललं! मंदिरात दर्शन घेतलं अन् एकाच छत्रीत फिरले ऋषी सुनक-अक्षता मूर्ती, कपलचे सुंदर फोटो व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्विट :
प्रसिद्ध उद्योगपती @anandmahindra यांनी त्यांच्या अधिकारीक ट्विटर अकाउंटवरून हे ट्विट शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, आज जागतिक ईव्ही दिवस आहे, हा दिवस मला पुन्हा भूतकाळात घेऊन गेला आहे. १९९९ मध्ये @MahindraRise चे दिग्गज नगरकर यांनी आमची पहिली तीनचाकी ईव्ही (EV- 3) ‘बिजली’ तयार केली. निवृत्तीपूर्वीची ही त्यांची भेट होती. त्यांचे शब्द मी कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कॅप्शन लिहिली आहे आणि ‘बिजली’सोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. पहिली तीनचाकी ईव्हीची एक झलक तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघाच …
‘बिजली’ परत आणण्याचे आवाहन :
पहिल्या तीनचाकी ईव्हीचे नाव ‘बिजली’ असे होते. जागतिक ईव्ही दिनानिमित्त आनंद महिंद्रा यांनी ही खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी ही गोष्ट शेअर केल्यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही लोकांनी ‘बिजली’ला परत आणण्याचे आवाहन केले आहे.