Australian Reporter Ends Up Slapping Herself : एका महिला पत्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लाईव्ह शोदरम्यान स्वत:च्याच चेहऱ्यावर चापत मारताना दिसत आहे; जे पाहून शोमध्ये उपस्थित असलेले इतर लोकही आश्चर्यचकित झाले. मात्र, नंतर पत्रकार महिलेने स्वत:लाच चापट का मारली याचे कारणही समोर आले. तिच्या चेहऱ्यावर एक डास बसला होता, त्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात तिने स्वत:लाच चापट मारली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोकही त्यावर खूप हसत आहेत.
अँड्रिया क्रॉथर असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या टुडे शो या वृत्तसंस्थेत काम करते. या घटनेनंतर अँड्रिया तिच्या पुढच्या लाईव्ह शोदरम्यान हेडपीस घातलेली दिसली.
बाबो! लाईव्ह क्रिकेट मॅचदरम्यान भल्यामोठ्या घोरपडीची एन्ट्री; मध्येच थांबला कसोटी सामना, पाहा Video
अँड्रिया नुकतीच ब्रिस्बेन पुराची बातमी कव्हर करण्यासाठी ग्राउंडवर गेली होती. ती लाईव्ह ऑन एअर असताना अचानक तिच्या चेहऱ्यावर येऊन एक डास बसला, यावेळी त्याला हुसकावत असताना तिने स्वत:च्याच चेहऱ्यावर चापट मारली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर अँड्रिया लगेच लाईव्ह कॅमेऱ्यापासून दूर गेली, मात्र या घटनेचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे, ज्यावर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.
व्हिडीओ सुरू होण्याआधी होस्ट कार्ल स्टेफानोविक म्हणते की, ‘आज एक छोटीशी मजेदार घटना घडली. अँड्रिया क्रॉथर, जी आमच्या शोच्या रिपोर्टर्सपैकी एक आहे, ती ब्रिस्बेनमधील पुराची घटना कव्हर करत होती, जे एक विलक्षण काम आहे. पण, तेथील फार दमट वातावरणामुळे तिथे भयंकर कीटक होते. तसेच डासांचा खूप आवाज येत होता. याचवेळी लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान ऑनएअर असताना तिला एका डासाचा सामना करावा लागला. तुमच्या घरापर्यंत प्रत्येक बातमी पोहोचवण्यासाठी पत्रकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.` दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक त्यावर खूप हसत आहेत.