70th Republic Day 2019 : प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे दिल्लीतील राजपथावर दिमाखात दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. भारतीय संस्कृती, लोकशाहीची ताकद, भारतीय सैन्य, हवाईदल आणि वायूदलाच्या कवायती, विविध राज्यांचे चित्ररथ अशा दिमाखदार सोहळ्यात राजपथावर हा दिमाखदार आणि डोळे दिपवणारा सोहळा पार पडतो. राजपथावरचे हे संचलन या दिवशीचे खास आकर्षण असते. या सोहळ्याची परंपरा १९५० पासून सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन कुठे पार पडले? याचे उत्तर राजपथ नक्कीच नाही. तर प्रजासत्ताक दिनाचे पहिले संचलन नॅशनल स्टेडियम येथे पार पडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीबीसीने दिलेल्या माहिनुसार प्रजासत्ताक दिनाचे पहिले संचलन त्याकाळच्या इर्विन स्टेडियमध्ये पार पडले होते. हा सोहळा इर्विन स्टेडियम, लाल किल्ला, राम लिला मैदान अशा विविध ठिकाणी १९५० ते १९५४ च्या काळात आयोजीत करण्यात आला होता. १९५५ नंतर या संचलन सोहळ्याचे आयोजन राजपथावर करण्यात आले. १९५० मध्ये इर्विन स्टेडियम येथे पार पाडलेल्या या सोहळ्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा पाहण्यासाठी त्यावेळी इर्विन स्टेडियमवर १५ हजार देशवासीय उपस्थित होते. यावेळी या संचलनात सैन्य, वायू आणि नौदाचा सहभाग होता आणि सेनेचे सात बँड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांनी उपस्थिती लावली होती.