70th Republic Day 2019 : भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन उद्या देशभरात उत्साहात साजरा होईल. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. पण देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत.
६ मिनिटे २८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.
तर आणखी एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कशाप्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देत आहेत.