Republic Day 2022: २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, परंतु देशात एक मंदिर आहे जिथे आज म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात (Ujjain Ganesh Mandir) आज प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यामागचे कारण खूपच मनोरंजक आहे.

आज प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

वास्तविक, उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात राष्ट्रीय सण, दिवस इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरे केले जात नाहीत, तर हिंदू कॅलेंडरच्या तारखेनुसार साजरे केले जातात. त्यामुळे या मंदिरात आज म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?
Reliance Jio Republic Day Offer 2025
Republic Day Offer 2025 : अशी भन्नाट ऑफर शोधून सापडणार नाही! फक्त एकदा करा रिचार्ज आणि मिळवा भरपूर कूपन
Republic Day 2025 How India chooses its chief guest for Republic Day celebrations
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत
Republic Day 2025 Updates: प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा समारोप
Republic Day Quiz 2025 quiz five questions about General Knowledge 26 January Information Gk
Republic Day Quiz 2025: २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? या आणि अशाच काही रंजक प्रश्नांची द्या झटपट उत्तरं!

(हे ही वाचा: Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!)

प्रजासत्ताक दिन अष्टमी तिथीला केला जातो साजरा

भारतात प्रजासत्ताकची स्थापना २६ जानेवारी १९५० रोजी झाली होती आणि तो दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी होती. त्यामुळे दरवर्षी उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोमध्ये हृदयाच्या आकाराचा फुगा कुठे आहे?)

१० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला गेला

आज (९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता गणेश मंदिरात राष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी देवाची पंचामृत अभिषेक-पूजा केली गेली. दुपारी १२.३० वाजता अक्षय कलशाची स्थापना करण्यात आली १० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.

(हे ही वाचा: ट्रकने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, भीषण अपघाताचा video viral)

असा प्रजासत्ताक साजरा करणारे एकमेव मंदिर

उज्जैनचे बडा गणेश मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्व राष्ट्रीय सणांच्या व्यतिरिक्त सण आणि व्रत साजरे केले जातात.पंडित आनंद शंकर व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरात गणपतीला दुर्वा आणि लाल फुले अर्पण करून करोना संकट निवारणासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात येणार आहे. याशिवाय भाविक मंदिरात येऊन देशात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतात.

Story img Loader