India’s First Republic Day Video: प्रजासत्ताक दिन हा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ७५ वा असल्याने सोहळा आणखीनच खास होणार आहे. आज याच निमित्ताने आपण, भारताच्या पहिल्या वहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या काही खास आठवणी पाहणार आहोत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले हे काही खास क्षण आपल्याला पुन्हा एकदा १९५० व्या वर्षात घेऊन जातील, अशी आशा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ ६ मिनिटे २८ सेकंदाचा असून यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. तसंच सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहेत.

तर अजून एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये प्रजासत्ताक दिन कशाप्रकारे साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देताना दिसत आहेत.

हे ही वाचा<< Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा! एकापेक्षा एक हटके मेसेज, पाहा लिस्ट

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day 2024 video of first ever republic day celebration in 1950 watch pm jawaharlal nehru president speech historic moment svs
First published on: 26-01-2024 at 09:57 IST