Delhi Airport flight restrictions 2025: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) विमान वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे विमान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुढील ८ दिवस विमानसेवा राहणार ठप्प

HMPV virus in India PM Modi lockdown fact check
भारतात २१ दिवसांचा लॉकडाउन! पंतप्रधान मोदींनी केली घोषणा? पण VIDEO VIRAL मागचं सत्य काय, वाचा…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
today horoscope shukra gochar 2025
१ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींचे लोक होणार कोट्यधीश! शुक्राच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने मिळणार नोकरीत बढती अन् अपार संपत्ती
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

DIAL ने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २६ जानेवारी २०२५ या प्रजासत्ताक दिन सप्ताहासाठी जारी केलेल्या NOTAM (एअरमनला नोटीस) नुसार, दिल्ली विमानतळावरून सकाळी १०:२० ते १२ दरम्यान कोणतीही फ्लाइट येणार नाही किंवा निघणार नाही.तसेच प्रवाशांना संबंधित बुक केलेल्या एअरलाइन्ससह त्यांचे वेळापत्रक क्रॉस-चेक करण्याचा सल्ला दिला आहे.

दिल्लीतील IGIA सर्वात व्यस्त विमानतळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे, जे दररोज सुमारे १,३०० उड्डाणे करतात. ही परिस्थिती लक्षात घेता, प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेच्या खबरदारीमुळे वेळापत्रकात बदल केले आहेत.
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने शनिवारी घोषित केले की १९ जानेवारी २०२५ (रविवार) पासून आणि २६ जानेवारी २०२५ (रविवार) पर्यंत दिल्ली विमानतळावर कोणतीही विमाने उतरणार नाहीत किंवा टेक ऑफ करणार नाहीत. सकाळी १०:२० ते दुपारी १२:४५ दरम्यान कोणतीही फ्लाइट येणार नाही किंवा निघणार नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

पाहा नोटीस

तसेच विमानाच्या अधिक माहितीसाठी, प्रवाशांना संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे

२६ जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

Story img Loader