26 January Republic Day: आज २६ जानेवारी, भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. शाळा, कॉलेज, सोसायटी, संस्था, गल्लीबोळात लहान मोठे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतात अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून हा दिवस साजरा केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यादिवशी देशभक्तीपर गीते लावली जातात आणि सर्वत्र एक देशाच्या अभिमानाचा माहोल तयार होतो. या सगळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील होत असतात, पण सध्या या प्रजासत्ताक दिनी एक आगळावेगळा पण धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
झेंडा घेऊन केला स्टंट (Bike stunt goes viral on Republic Day)
सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या बाइकवर उभा राहून गाडी चालवत आहे. बरं इतकंच नाही तर देशप्रेम दाखवण्यासाठी त्याने पांढरा कुरता, डोक्यावर फेटा आणि हातात भारताचा झेंडाही घेतला आहे. सेल्फी स्टिकने तो व्हिडीओ शूट करत आहे. “फिर भी दिल है हिंदुस्तानी” या गाण्यावर त्याने व्हिडीओ शूट केला आहे आणि त्याचं देशप्रेम दाखवलं आहे. बाईकवर उभं राहून असा स्ंटट केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतंय.
तरुणाचा हा व्हिडीओ @amitvermaofficial01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “झंडा ऊंचा रहे हमारा” अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला तब्बल ५.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. तसेच या तरुणाने देशभक्तीच्या गाण्यांवर असेच बाइकवर स्टंट करत अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत, जेदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकानं कमेंट करीत लिहिलं, “प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिंद” तर दुसऱ्यानं, “मस्त भाऊ, एक नंबर” अशी कमेंट केली. तिसर्यानं कमेंट करीत लिहिलं, “फक्त सोशल मीडियावरील लाइक्स आणि कमेंट्ससाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका.” तर एकजण म्हणाला, “देवाने आयु्ष्य एकदाच दिलंय त्यामुळे असं काही करण्याआधी कुटुंबाचाही विचार कर”
दरम्यान, अनेकांना हा स्टंट आवडला असून तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर काहीजण तो त्याच्या जीवाची पर्वा न करता अशी स्टंटबाजी करतोय म्हणून नाराज आहेत.