Republic Day 2025 Quotes Status : २६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या संविधानाला मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक भारताची सुरुवात झाली. हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी देशाची राजधानी, नवी दिल्ली येथे राजपथावर एक भव्य पदपथसंचलन आयोजित केले जाते. प्रजासत्ताकदिनी होणारे पथसंचलन हा देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक. त्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रालयासमोर आपले वैविध्यपूर्ण चित्ररथ प्रस्तुत केले जातात. त्यात प्रत्येक राज्यांची अस्मिता-संस्कृती आणि भौगोलिक भिन्नतेचे दर्शन घडते. शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालये, क्रिया शिबिरे, इत्यादी ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरात देशभक्तीपर गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रत्येक जण एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. सध्या ऑनलाईनच्या जगात, व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, मेसेजद्वारे किंवा स्टेटस किंवा स्टोरी शेअर करून शुभेच्छा दिल्या जातात आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. (Republic Day 2025 Wishes SMS Messages in Marathi)
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
देशासाठी जन्म आपुला सेवा आपुले काम,
देशासाठी चंदन होऊन झिजो अखंडित प्राण…
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
एक देश, एक स्वप्न, एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेवू सारे रंग त्याचे घेऊ प्रण हा मनाशी
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
देश सर्वांपुढे मोठा आहे.. या देशासाठी लढणाऱ्या त्या शुर वीरांना शत् शत् प्रणाम…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही. एक देशा, भारत देशा…प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले,
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो
बलसागर भारत होवो…
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
उत्सव राष्ट्राचा आभाळी सजला
सलाम त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा!
© IE Online Media Services (P) Ltd