प्रजासत्ताक दिनाचा सोहळा काल दिमाखात पार पडला. दरवर्षीप्रमाणे राजपथावर संचलन पार पडलं. राष्ट्रपती,पंतप्रधानांना सलामी देण्यात आली. साहसी खेळ पार पडले. आपल्या सोसायट्यांमध्ये मोठ्ठ्या आवाजात ‘ए मेरे वतन के लोगो’ची आवर्तनं झाली. देशभक्तीपर गाणी संपली म्हणून कार्यकर्त्यांनी हळूच इतर गाणी पण वाजवून घेतली. आणि कालचा दिवस संपला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतकी वर्षं अशाच नेमाने पार पडणारा हा दिवस आता बदलत्या काळानुसार वेगळ्या पध्दतीनेही साजरा होतोय तो नेटवर. काल राजपथावर संचलन झाल्याझाल्या त्यासंबंधीची मीम्स नेटवर व्हायरल होऊ लागली.

‘कोण म्हणतं वाचन कमी झालंय?’

सौजन्य- ट्विटर

 

‘लो बजेट सुपरमॅन’

सौजन्य- ट्विटर

 

चित्र 1.-जेव्हा तुमची आवडती मैत्रीण तुमच्या बाजूने जाते

चित्र२. – जेव्हा तिचे बाबा जातात

सौजन्य- ट्विटर

 

‘परिक्षेच्या आधी १ महिना आणि प्रत्यक्ष परीक्षा हाॅलमधली स्थिती’

सौजन्य- ट्विटर

राजपथावरची संचलनं दिमाखदार असतात यात वाद नाही. आपल्या सीमांवर खडा पहारा देणारे आपल्या सेनादलांचे जवान दुखापतीचा धोका पत्करत हे साहसी खेळ करतात. हे खेळ करत असताना लागणारी कमालीची एकाग्रता लागते जी प्रचंड मेहनतीने कमवावी लागते.

वाचा- प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यांच्या नावावर जगातील महागड्या लग्नसोहळ्याचा विक्रम

पण विमानांच्या कसरती सोडल्या तर बाकीच्या या कसरतींमध्ये इतक्या वर्षांनंतर तोचतोचपणा येतोय का? देशांच्या सीमांचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचं शौर्य त्यांनी फक्त सर्कससारखे कसरतीचे खेळ करून सिध्द होतं का?

viral : प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात संरक्षणमंत्री पर्रिकरांना झोप अनावर

इंटरनेटवर कालच्या प्रजासत्ताक दिनानंतर व्हायरल झालेले मीम्स कोणाला देशाचा अपमानही वाटू शकेल. पण ही मीम्स जनतेच्या बदलणाऱ्या आवडीनिवडींचं प्रतीक आहेत. शेवटी किती दिवस आपण कसरती दाखवत सेनेच्या जवानांना टीव्ही कॅमेऱ्यांसमोर आणणार? या आणि अशाच निर्माण झालेल्या इतर प्रश्नांची उत्तरं विनोदाद्वारे शोधण्याचा प्रयत्न इंटरनेटवर अनेकांनी केला आहे.