तुर्कस्तानमधील भयंकर भूकंपामुळे तेथील अनेक शहरं उद्धवस्त झाली आहेत. अनेकांच्या लाखो करोडोंच्या मालमत्तेच नुकसान झालं आहे तर कित्येत नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. अनेकांची संपत्ती मातीच्या ढीगाऱ्याखाली गेली आहे. अशातच पूर्व तुर्कस्तानमधील एका बचाव पथकाला संपत्तीचा खजाना सापडला आहे. पैसे सापडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हो कारण या बचाव पथकाला कोसळलेल्या इमारतीखाली जवळपास दोन मिलियन डॉलर्सची रोकड सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅझियानटेप शहरातील बचाव पथकाला ही रोकड सापडली आहे. ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे हे शहराचे सर्वाधिक नुकसान झाले होते. बचाव कार्य करणाऱ्यांना भूकंपात कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ही रोकड सापडली.

हेही वाचा- मुलीकडच्या मंडळींनी दिलेल्या हुंड्यावर संशय घेत स्वत:च्या लग्नालाच गैरहजर राहिला नवरदेव

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इमारत एका श्रीमंत व्यावसायिकाची होती आणि त्याने त्याच्या तिजोरीत हे पैसे ठेवले होते. शिवाय या ठिकाणी आणखी काही पैसे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्की सरकार भूकंपग्रस्तांना सतत मदत करत आहे. अशा स्थितीत ही रक्कम सापडल्यामुळे सरकार या पैशाचा वापर कसा करणार, असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. परंतु सरकेर हे पैसे मदत कार्यात वापरणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

हेही वाचा- नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…

पूर्व तुर्कीमध्ये मागील आठवड्यात पुन्हा भूकंप झाला त्यामध्ये किमान ४१ जणांचा मृत्यू झाला होता आणि १६०० हून अधिक लोक जखमी झाले होते. भूकंप झालेल्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू असून अनेक नागरिक बेपत्ता आहेत. अशातच या सापडलेल्या पैशांमुळे शोधकार्याला काही आर्थिक हातभार लागणार असल्याचं बोलल जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescue team finds treasure trove of money in earthquake ravaged turkey video viral jap
Show comments