पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल नेटवर्किंगवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या समर्थकांनी ट्विटरवर #Resign_PRimeMinister हा हॅशटॅग वापरुन आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. एकीकडे देशामधील पेट्रोल, खाद्यतेल, भाज्यांचे दर वाढलेले असतानाच दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था, नोकऱ्यांची संधी, रोजगार आणि जीडीमध्ये घट होतानाचे चित्र दिसत असल्याची टीका केली जात आहे. #Resign_PRimeMinister या हॅशटॅगमधील प्राइम शब्दातील पी आणि आर ही अक्षर मुद्दाम कॅपीटलमध्ये वापरुन मोदी केवळ जाहिरातबाजी करणारे पंतप्रधान असल्याचा टोला लगावण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवार सायंकाळपासून सोशल नेटवर्किंगवर सुरु झालेल्या #Resign_PRimeMinister या ट्रेण्डमध्ये हजारो लोकांना ट्विट केलं असून सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. पाच ट्रिलीयन इकनॉमीच्या नावाखाली सरकारने सारं काही विकून टाकलं आहे, मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवण्याची गरज आहे, मोदी हे केवळ जाहिराती करतात, जनता त्रस्त… भाजपा मस्त.., ब्लू टीकसाठी लढतात लसींसाठी नाही या आणि अशा अनेक पद्धतीच्या टीका सोशल नेटवर्किंगवरुन करण्यात आल्या आहेत. अगदी महाराष्ट्र काँग्रेसपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुन हा हॅशटॅग वापरुन ट्विट्स केले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विट्स…

१) काय वाढलं आणि कशात झाली घट…

२) पाच ट्रीलियनच्या नादात…

३) पीआरच्या बाबतीत मोदीच अव्वल

४) एकत्र काम करण्याची गरज

५) त्यांना साऱ्यांची भीती वाटते

६) पंतप्रधान म्हणून मोदी अयोग्य

७) फरक

८) राजीनामा द्या

९) भारतीय अर्थव्यवस्था…

१०) जनता त्रस्त… भाजपा मस्त…

११) मंत्रिमंडळ फेर बदलाचा काही फायदा झाला का?

१२) खोटारडेपणावर टीका

१३) त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही

१४) ते भारताला सुरक्षित ठेऊ शकत नाही

१५) ब्लू टीकसाठी लढतात लसींसाठी नाही

१६) पीएम हवेत…

१७) सगळेच वैतागलेत…

१८) ट्रेण्डमध्ये…

१९) सगळं विकणार…

२०) देश वाचवा

मागील काही काळामधील घडामोडींची सांगडही अनेकांनी या ट्रेण्डमध्ये ट्विट करताना घातल्याचं पहायला मिळालं आहे. ठराविक उद्योजकांना संधी दिली जाते अशी टीका मुंबई विमानतळासंदर्भात मंगळवारी झालेल्या करारासंदर्भात बोलताना अनेकांनी केलीय. तसेच पंतप्रधान केवळ जाहिरातबाजी करतात असाही आक्षेप अनेकांनी घेतलाय.