Resignation Letter Viral Video : प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम ठरवते. त्या नियमाप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वागावे लागते. ज्याप्रमाणे कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याची मुलाखत किंवा चाचणी घेतात. त्याचप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनी सोडताना त्याचा राजीनामा द्यावा लागतो. त्या राजीनामा पत्रात कर्मचाऱ्याला कंपनी सोडण्याचे कारण देणे अपेक्षित असते. आत्तापर्यंत तुम्ही अनेक लोकांचे राजीनामे पाहिले असतील, ज्यात तुम्ही नोकरी सोडण्यामागची वेगवेगळी कारणे वाचली असतील; पण आता कर्मचाऱ्याचा असा राजीनामा व्हायरल होत आहे, जो वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

असा राजीनामा तुम्ही कधी पाहिला आहे का?

सध्या एका व्यक्तीने दिलेला राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या व्यक्तीने लिहिले आहे की, “मी काही कारणास्तव कंपनीचा राजीनामा देत आहे, मला एका कंपनीत नोकरी मिळाली आहे आणि मला त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करायचे आहेत. पण, ते प्रयत्न यशस्वी झाले नाही तर मी या कंपनीत पुन्हा येईन.” यानंतर त्याने त्यांच्या मॅनमेंट आणि मिस्टर नप्पो यांचे आभार मानले.

Chhagan Bhujbal allegations against Sharad Pawar regarding Telgi case pune news
तेलगी प्रकरणात राजीनामा घेण्याची शरद पवारांंना घाई; छगन भुजबळ यांचा आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
US-based company shuts down without notice Mass layoffs
Mass layoffs : अमेरिकेतील कंपनीने पूर्वसूचना न देता गुंडाळलं भारतातील कामकाज! हजारो कर्मचार्‍यांना मिळाले नोकरीहून काढल्याचे ईमेल
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Marathi actress Tejashri Pradhan Talk about Divorce controversy
घटस्फोटानंतर तेजश्री प्रधान सगळ्यांना कशी सामोरे गेली? म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी त्याला…”
Techies Bengaluru traffic meeting idea is a hit online
ट्रॅफिकमध्ये अटेंड करता येईल ऑफिस मिटिंग? Viral Photo पाहून सुचला भन्नाट जुगाड, नेटकऱ्यांना प्रंचड आवडली कल्पना
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”

तुम्ही अनेक राजीनामे पाहिले असतील, पण राजीनामा पत्रात त्याच कंपनीत पुन्हा येण्याबाबत कोणी लिहिले असेल असे तुम्ही कधी पाहिले नसेल, त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हॉटेल, रेस्टॉरंटमधील लोणचं आवडीनं खाताय? मग ‘हा’ Video पाहाच; तुम्हालाही वाटेल किळस

“मराठीनंतर उर्दूला अभिजात भाषेचा दर्जा द्या” उद्धव ठाकरेंची मागणी? पोस्ट व्हायरल; कॉल करताच समजलं सत्य…

“भाऊचा प्लॅन बी आहे” युजरची कमेंट

या राजीनामा पत्राचा फोटो इन्स्टाग्रामवर @Wallstreetosis नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, भाऊ प्लॅन बी आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा माणूस खूप प्रामाणिक आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, मिस्टर नप्पोदेखील अवाक झाले असतील. शेवटी एका युजरने लिहिले आहे की, मिस्टर नप्पो हंटर घेऊन त्याच्या भव्य स्वागताची वाट पाहत आहेत.

Story img Loader