महागाई वाढल्याने सर्वच वस्तुंच्या किंमत वाढल्या आहेत. अगदी एक वेळचे जेवायचे असेल तरी बराच खर्च करावा लागतो. महिन्याभरात वेगवेगळ्या गोष्टींचे बिल्स आणि इतर खर्चामध्ये पगार वपारला जातो, महिना अखेर असेल तर सगळ्यांची मोठी तारांबळ उडते. अशात सगळ्या वस्तुंची किंमत कमी व्हावी किंवा आपण महागाई नसलेल्या काळात जन्माला यायला हवे होते असे तुम्हालाही वाटले असेल. महागाई नसणाऱ्या काळात पैशांची किती बचत होत असेल, तेव्हा वस्तुंच्या किंमती किती असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचेच उत्तर देणारा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
फेसबूकवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सुमारे ४ दशकांपुर्वी हॉटेलमधील जेवणाची किंमत किती होती हे दिसत आहे. हॉटेलमधील जेवणाचे हे बिल १९८५ मधील आहे. या बिलमध्ये ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी असे पदार्थ दिसत आहेत. आजच्या काळात या पदार्थांची एकुण किंमत ५०० ते १००० रुपयांपर्यंत होईल, पण १९८५ मध्ये या पदार्थांची एकुण किंमत फक्त २६ रूपये होती. यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण व्हायरल होणारा हा फोटो पाहून तुम्हाला यावर विश्वास बसेल.
आणखी वाचा : सगळा संसारच बाइकवर रचला अन्…; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, ‘आता कर्ज काढून…’
व्हायरल फोटो :
दिल्लीमधील लाजपत नगर येथील लजीज रेस्टॉरंट अँड हॉटेल यांनी हे १९८५ मधील बिल शेअर केले आहे. नेटकऱ्यांनी या किंमतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी यावर कमेंट करत याची आजच्या किमतींशी तुलना केली आहे. ‘एवढ्या किंमतीमध्ये आता फक्त एक चिप्सचे पाकीट येऊ शकते’, असे एका युजरने म्हटले आहे.