Viral Photo Shows IFS officer shared vegetable buying guide : आईने पहिल्यांदा मार्केटमध्ये भाजी आणायला पाठवल्यावर आपल्यातील अनेकांची तारांबळ उडते. विकत घेतलेली भाजी आईला पसंत पडेल का, आपण खराब भाजी तर घरी घेऊन जाणार नाही ना? आपण खरेदी करताना काही विसरत तर नाही आहोत ना? याची चिंता मनात सतत असते. म्हणून काही जण मोबाईलमध्ये किंवा एका कागदावर काय खरेदी करायचं आहे याची यादी करून ठेवतात. आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट (Photo) व्हायरल होत आहे. यामध्ये आयएफएस अधिकारी यांच्या पत्नीने त्यांच्याकडे मार्केटमधून भाजी कशी आणायची याची एक यादी दिली आहे.
निवृत्त इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (IFS) अधिकारी मोहन परगायन भाजी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जात होते. तर ते पहिल्यांदा मार्केटमध्ये जाणार म्हणून त्यांची पत्नी त्यांना एक यादी बनवून देते. तसेच ही फक्त साधी यादी नव्हती; तर त्यामध्ये भाज्या कशा निवडायच्या यावरील बारीकसारीक वर्णन, काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा लिहिण्यात आल्या होत्या. प्रत्येक भाजीसाठी एक खास सूचना लिहिली होती. नक्की काय लिहिलं आहे या यादीत ते व्हायरल पोस्टमधून (Photo) तुम्हीसुद्धा बघा…
पोस्ट नक्की बघा…
https://twitter.com/pargaien/status/1834442712285618196
मिरची फ्रीमध्ये विक्रेत्याकडे मागा :
व्हायरल पोस्टमध्ये (Photo ) तुम्ही पाहिलं असेल की, प्रत्येक भाजी स्वतःच्या खास सूचनांसह लिहिलेली आहे. टोमॅटो लिहून ते पिवळे, लाल यांचे मिश्रण असले पाहिजेत; नरम किंवा छिद्रं असलेले आणू नयेत. तर बटाटे मीडियम (मध्यम) आकाराचे आणावेत, त्यासाठी बाजूला चित्रसुद्धा काढलं आहे. तसेच पालक, कांद्याचे आकार, ते योग्य पद्धतीने कसे निवडायचे यासाठी अगदी व्यवस्थित माहिती लिहून, तर मिरची डार्क ग्रीन, थोडी लांब असेल अशी आणा आणि फ्रीमध्ये विक्रेत्याकडे मागा, असंसुद्धा आवर्जून लिहिलं आहे; जेणेकरून आयएफएस अधिकारी यांना भाजी विकत घेताना मदत होईल.
सोशल मीडियावर निवृत्त इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (IFS) अधिकारी मोहन परगायन यांच्या @Pargaien अधिकृत (एक्स) ट्विटर अकाउंटवरून हा फोटो (Photo) शेअर करण्यात आला आहे. ‘भाजी आणायला बाजारात जात असताना, माझ्या पत्नीनं माझ्याबरोबर हे शेअर केलं. तुम्हीसुद्धा ही लिस्ट (Photo ) भाजी खरेदी करताना मार्गदर्शन म्हणून वापरू शकता’, अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. ही यादी पाहून अनेक युजर्स ‘या फोटोची (Photo) नक्कीच मदत होईल’, असं विविध पद्धतींनी सांगताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.