आपण आजवर काही रिऍलिटी शो मध्ये लाईटबल्ब, ट्यूबलाईट, बाटल्या खाताना लोकांना पाहिलं असेल. अलीकडेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक वृद्ध व्यक्ती लाकडाचा भुसा, चारा खाताना पाहायला मिळत आहे. आता हे ऐकून हा कोणतीतरी अघोरी असावा किंवा मानसिक रुग्ण असावा असे तुम्हाला वाटून गेले असेल पण हा इसम चक्क रस्ते विकास विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचे सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार कोल्हुईच्या रुद्रपूर शिवनाथ गावचे रहिवासी बुधिराम हे वर्षभर सामान्य नागरिकांप्रमाणे राहतात पण नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या अंगात महिषासुराचा आत्मा येत असल्याच्या चर्चा आहेत.
तरुणाने गिळली चक्क 63 नाणी, 2 दिवस पार पडली शस्त्रक्रिया, कारण ऐकाल तर व्हाल थक्क
महराजगंज जिल्ह्यातील रहिवाशी बुधिराम यांच्या व्हायरल व्हिडीओ मध्ये ते एका देवीच्या मंदिरातील महिषासुराच्या मूर्तीसमोर बसून जनावरांप्रमाणे भुस्सा, चारा खाताना दिसत आहेत. मागील ४०-४५ वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी शरीरात महिषासुराचा आत्मा प्रवेश करून अशाच प्रकारे लाकडाचा भुगा व चारा खायची इच्छा करत असल्याचे बुधिराम स्वतः सांगतात.
जेव्हा ‘त्यांच्या’ शरीरात महिषासूर शिरतो ..
आपण व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहू शकता की बुधिराम यांच्या मागे जय बाबा भैसासुर असे लिहिलेले आहे. दरवर्षी त्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बुधिराम हे लाकडी भुगा व चाऱ्याच्या परडीत व पाण्यात तोंड घालताना एखाद्या प्राण्याप्रमाणे वागताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. लोकही त्यांना केळी खाऊ घालत आहेत.
हा थक्क करणारा प्रकार पाहून अनेक जण त्यांचे दर्शन घ्यायला नागपंचमीच्या दिवशी आवर्जून या गावात येतात. बुधिराम सुद्धा व्हिडीओ मध्ये हात वर करून सर्वांना आशीर्वाद देताना पाहायला मिळत आहे.
(सुचना- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)